नवऱ्यासाठी मराठी कविता | Marathi Kavita On Life Partner

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज नवरा बायको प्रेम कविता, नवरा तो नवराच असतो, maza navra kavita, husband poem marathi, marathi kavita for husband birthday wish, marathi kavita on marriage life, sorry poem for husband in marathi, marathi prem kavita tyachyasathi, नवरा बायको विश्वास कविता, मराठी नवरा कविता या संधर्भात माहिती मिळेल.

Marathi Kavita On Life Partner

नवरा म्हणजे समुद्राचा
भरभक्कम काठ
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ ll

कितीही येवो प्रपंच्यात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा ll

सर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो ll

कधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन
मशाली सारखं जळत असतं ll

नवरा आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही ll

बायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते
दुःख समजून न घेण्याची
अनेक बायकात उणीव असते ll

सारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll

सगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो ll

इकडे आड तिकडे विहीर
तशीच बायको आणि आई
वाट्टेल तसा त्रास देतात
कुणालाच माया येत नाही ll

 

 

maza navra kavita
maza navra kavita

त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
दारू गोळा भरू नका ll

दोस्ता जवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं ll

समजू नका नवरा म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे ll

मी म्हणून टिकले इथं
दुसरी पळून गेली असती
बायकोनं विनाकारण
नवऱ्याला धमकी दिलेली असती ll

घरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll

सारख्या सारख्या किरकिरीनं
त्याचं डोकं बधिर होतं
तडका फडकी बाहेर जाण्यास
खूप खूप अधीर होतं ll

घरी जायचं असं म्हणताच
त्याच्या पोटात गोळा येतो
घरात जाऊन बसल्या बसल्या
तोंडात आपोआप बोळा येतो ll

हे पण वाचा 👇🏻

नवरीसाठी उखाणे

 

maza navra kavita

नवरा म्हणा , वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का ?
त्यांच्या साठी कधी तरी
कुणाची आसवं गळतात का ? ll

पेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही
कितीही पाय दुखले तरी
मनावर कुणी घेत नाही ll

वेदनांना कुशीत घेऊन
ओठ शिउन ‘ तो ‘ पडून राहतो
सर्वांच्या सुखासाठी
एकतारी भजन गातो ll

बायको आणि मुलांनी
या संताला समजून घ्यावं
फार काही नकोय त्याला
दोन थेंब सुख द्यावं ll

मग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे
किती जणांच्या लक्षात येतं ? ll

मराठी कविता नवऱ्यासाठी

 

नवरा बिचारा काय म्हणतो
किमान ऐकून घ्या
पटलं तर हो म्हणा
नसता सोडून द्या

साध्या क्षुल्लक कारणा वरून
वाद घालू नका
घरातल्या मोठ्या माणसांना
चर चर बोलू नका

काय उपयोग आहे तुझ्या
उच्च शिक्षित असण्याचा
मुळीच गर्व करू नकोस
थोडं बरं दिसण्याचा

नौकरी करतेस , हातभार लावतेस
चांगली गोष्ट आहे
फड फड तुझं बोलणं
कुठं बेस्ट आहे ?

आईशी सलगी करतांना
सासुशी नको भांडू
आयुष्यातले सुखाचे क्षण
उगीच नको सांडू

स्वछता , टापटीप
घर पॉश असावं
याचा अर्थ असा नाही की
घरात कुणीच नसावं

थकलेले आई वडील
सांग कुठे जातील ?
आज ना उद्या आई बाबा
मुला कडेच येतील

खरं सांग या मुद्द्यावर
भांडण व्हायला पाहिजे का ?
म्हातारपणी त्यांनी काय
आश्रमात जायला पाहिजे का ?

अशिक्षित आहेत ,साधे आहेत
मान्य आहे मला
याचा अर्थ असा नाही की
घालून पाडून बोला

आई वडिलांचं दिसणं नाही
असणं महत्वाचं असतं
म्हातारी माणसं असतील तर
घर शोभून दिसतं

आई वडील घरात असणं हा
इंटेरियरचाच भाग आहे
समजू नकोस सुरकूतला चेहरा
पॉश हॉलला दाग आहे

खर्च होतो खर्च होतो
होऊ दे आशीर्वाद मिळेल
तू म्हातारी झाल्यावर तूला
सारं काही कळेल

शिकली सवरली मुलगी तू
यावरून घटस्फोट व्हावेत ?
लाखोंचं पॅकेज असलं तरी
मार्क शून्य द्यावेत

तुझ्या आई वडिलांचा
मी आदर करतो
पाहतीस तू चालतांना
त्यांचाही हात धरतो

थकलेल्या देहां सोबत
आपलं तुपलं करू नको
माणसांना दूर फेकून
वस्तूंनी घर भरू नको

म्हाताऱ्याना काही नको
फक्त गोड बोला
म्हण न तू सासूबाई
वालाच्या शेंगा सोला

मुलींनो समजून घ्या
नवरा काय म्हणतो
माया ,प्रेम ,आपुलकीनेच
फ्लॅट स्वर्ग बनतो !

अहंकार आणि राग राग करून
आपलं घरटं मोडू नका


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, नवऱ्यासाठी मराठी कविता | Marathi Kavita On Life Partner हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment