बाप मराठी कविता | Baap Kavita Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज वडिलांविषयी कविता, Marathi Kavita Baap, marathi kavita for father birthday, baba kavita in marathi text, short poem on father in marathi, aai baba var kavita,maze baba kavita, वडील म्हणजे काय, बापावर कविता या संधर्भात माहिती मिळेल. 

 

Baap Kavita Marathi

आपले चिमुकले हाथधरून जे
आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… .
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नए या साठी जे घाम गाळतात….
…..ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात….. ….ते बाबा असतात

हे पण वाचा 👇🏻

माझी आई कविता

घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

baba kavita in marathi text

जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , बाप मराठी कविता | Baap Kavita Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment