नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Wife
Marathistyle.com daily update Marathi ukhane for female, मराठी नवीन उखाणे,उखाणे मराठी sankranti,उखाणे मराठी नवरीचे,पारंपारिक उखाणे,सोपे उखाणे,उखाणे मराठी नवरदेव,ऐतिहासिक उखाणे, smart marathi ukhane, marathi ukhane for bride, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, marathi ukhane funny,marathi ukhane for wife marathi ukhane list.
Marathi Ukhane For Female
सुख-दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
……. रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले.
अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य,
…………रावांचा आनंद हेच माझे सौख्य.
आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……….. रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
आई वडिलांनी जन्म दिला, ब्रह्मदेवांनी बांधल्या गाठी,
माहेर सोडलं……. च्या सौख्यासाठी.
जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फुल विचारांचा,
…… सहा सुखी आहे प्रवास संगीत संसाराचा.
इंद्राचे इंद्रायणी, दुष्यंत यांची शकुंतला,
…… च्या नावाला आग्रह कशाला.
Ukhane in Marathi Comedy
तीस दिवसांचा महिना बारा महिन्याचे वर्ष,
…… पती मिळाले म्हणून मनी झाले हर्ष.
जाई लावली अंगणी, मोगरा लावला दारी,
……. च नाव घेते……. च्या घरी.
ईश्वराची कृपा, आई वडिलांचे प्रयत्न,
……. मला मिळाले सौभाग्याचे रत्न.
पौर्णिमेच्या रात्री चंद्रा पेक्षा हसरी असते चांदणी,
…… नाव घेताना आनंद होतो मनी.
लपाछपी च्या खेळात चंद्राला चांदणी असते साक्षाला,
……. नाव घ्यायला हवं कारण कशाला.
भाचीच्या लग्नात मामाला मिळतो मान,
……. बरोबर झाले शुभमंगल सावधान.
बंदी खाण्यात देवकीस कृष्ण झाला,
……. नी सौभाग्य अर्पण केले मला.
ब्रह्म, विष्णू, महेश समजतात पवित्र स्थान,
……नी दिला मला सौभाग्याचा मान.
महाविष्णूची लक्ष्मी नीलकंठची पार्वती,
…… ची…… राहो अखंड सौभाग्यवती.
शिवाजीने राज्य केले, शक्ती पेक्षा युक्ति ने,
…… नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
दसऱ्याला आपट्याची पाने हृदय मिलन दर्शविते,
…… ना दीर्घायुष्य परमेश्वराकडे मागते.
पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा,
……. हेच माझ्या सौभाग्याची शोभा.
प्रीतीच्या झुळकेने कळीचं फूल झालं,
……. च्या संगतीने जीवन सार्थक झालं.
…… माझे नाव……. माझे गाव,
…… चे नाव घेते……. माझे आडनाव.
सागर तिथे सरिता, पुष्प तिथे गंध, चंद्र तिथे चांदण्या,
…… च नाव घेते……. चि कन्या.
आयुष्याचा लावीन दिवा, कष्टांचे घालीन भरण,
……. च्या जीवनात लावीन यशाचे तोरण.
असू नये अभिमानी असावे मात्र स्वाभिमानी, नाव घेते
…… ची हृदय स्वामिनी.
पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब,
…… चे नाव घेण्यास लावत नाही विलंब.
मंडपाला सोडल्या कमानी, त्यावर विजेची रोषणाई,
……. चे नाव ऐकण्याची तुम्हाला एवढी कसली घाई.
लक्ष्मी शोभते दानात विद्या शोभते विनयात,
……. च्या जीवावर राहते मी मानात.
वागण्यात असावे प्रेम, बोलण्यात असावी गोडी,
सुखी ठेव देवा,……. ची जोडी.
Marathi ukhane for women
श्रावण मासी दर शुक्रवारी करतात जिवतीचे पूजन,
…… चे नाव घेते ऐका सर्वजण.
चंद्रोदय होताच संकष्टीला करतात गणेशाची आरती,
…… सुखी रहावेत हीच देवाला विनंती.
हिंदुस्तान देशात हिरे-मोती महागले,
…… सारखे रत्न हाती लागले.
श्रावण शुक्रवारी ज्येष्ठ देवीचे करतात पूजन,
…… चे नाव घेते ऐका सर्वजण.
तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खूण,
…… च नाव घेते……. यांची सून.
सुवर्णा ची अंगठी, रुपयाचे पैंजण,
…… रावांचे नाव घेते ऐका सर्वजण.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
……. राव सुखी राहोत आशीर्वाद मागते.
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार,
……. च्या रुपाने झाला साक्षात्कार.
जडवा चे मंगळसूत्र सोन्याने मढविले,
…… रावांच्या नावा करीता एवढे का अडविले.
मायामय नगरी प्रेममय संसार,
……. रावांच्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
Marathi ukhane for women
संसार रुपी सागरात पती-पत्नी नावाडी,
…… रावांच्या जिवावर घेते मनी मंगळसूत्र ची जोडी.
मंगळसूत्र जोडवे आहेत सौभाग्याचे अलंकार,
……. रावांच्या सर्व आशा होवोत साकार.
नीलवर्णी आकाशात चमकतात तारे,
……. रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे.
शिवाजीने राज्य केले शक्ती पेक्षा युक्ति ने,
……. रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून,
…… रावांचे नाव घेते……. ची सून.
इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर,
……. रावांचे नाव घेते सोडा माझा पदर.
इंग्रजी भाषेत चमचयाला म्हणतात स्पून,
……. रावांचे नाव घेते……. ची सून.
मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहार,
…… चा सहवास लाभो जन्मभर.
मंगलमूर्ती ला वाहते मी दुर्वाची जुडी,
…… च्यात व माझ्यात राहुदे अखंड गोडी.
Ukhane in marathi for female funny
नांदेडच्या गुरुद्वारा ला सोन्याचा कळस,
…… च नाव घ्यायचा मला नाही आळस.
दोन वाती एक ज्योती,
…… लाभोत मला जन्मोजन्मी साथी.
अंत नाही माझ्या सौख्या ला, किती वर्णू स्वभावाला,
……. सारखे पती मिळाले धन्यता वाटते मला.
माहेरची लाडकी लेक, सासरची लाडकी सून,
……. पति मिळाले आणखी काय भाग्य याहून.
पांडुरंगाला वाहतात तुळशीच्या मंजुळा,
…… च नाव घेते…… वेळेला.
रिन काढून सण करणे म्हणजे संसाराला दूषण,
…… चे नाव घेण्यात मला आहे भूषण.
नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर,
……. च्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर.
सर्व सणांमध्ये दिवाळीचा सण मोठा,
……. च्या सहवासात आनंदाला नाही तोटा.
शरदाचे चांदणी मधुवनी फुले निशिगंध,
……. चे नाव घेण्यात मला आहे आनंद.
मुळा-मुठेच्या संगमावर वसले सुंदर पुणे,
…… च्या संसारी नाही कशाचीच उणे.
नको मला दागदागिने, नको आकाशातले तारे,
…… हेच माझे अलंकार खरे.
माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले, स्मृती ठेवा त्यांचा घेऊन,
…… च्या घरी आले.
सोन्याच्या मंगळसूत्राला शोभतात काळे मणी,
…… आहेत माझ्या सौभाग्याचे धनी.
गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,
…… च्या संसारात आहे मी दंग.
वसंत ऋतुच्या आगमनाने शितल होते धरणीची काया,
…… नाव घेऊन पडते देवाच्या पाया.
आई-वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस,
…… पती मिळावे म्हणून…… ला केला नवस.
सीतेची पती भक्ती, सावित्री निग्रह,
…… च नाव घ्यायला मला नको आग्रह.
सावित्रीच्या प्रति प्रेमापुढे राम देखील हरला,
……. पती मिळाले म्हणून मी वड पुजला.
Ukhane in marathi for female funny
चंदनासारखी झिजावे उदबत्ती सारखे जळावी,
……. सारखे पति जन्मोजन्मी मिळावे.
आकाशात दाटून आले मेघ, मोर लागले नाचायला,
…… नाव घेण्यासाठी आग्रह कशाला.
मेघ आले आकाश भरून, मोराने फुलविला पिसारा,
…… च्या संसारी नेहमी सुखाचाच वारा.
समईत लावल्या वाती, उजळल्या ज्योती,
…… माझे जीवन साथी.
मेघ विखुरले सूर्यकिरण आले,
…… वरून धन्य मी झाले.
समईतील ज्योती भक्तिभावाने उजळाविते,
…… नाव प्रेमाने घेते.
बागेतील फुले पूजेसाठी तोडते,
…… चे नाव आनंदाने घेते.
Smart marathi ukhane female
गायीच्या शिंगांना लावला सोनेरी रंग
…….. राव बसले कामाला की होतात त्यात दंग.
गाण्याच्या मैफिलीत पेटीचा सूर
…….. रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर .
आईने वाढविल, वडिलांनी पाढविल
……. रावांनी त्यांची होताच सोन्याने मढविले.
दारापुढे वृंदावन , त्यात तुळशीचे झाड
……… रावांच्या गुनांपुढे दागिन्यांचा काय पाड.
करवत काठी धोतर अन डोक्याला पगडी
….. पंतांची स्वारी पहिलवान सारखी तगडी.
वैशाखाच्या महिन्यात उन्हाळ्याचा जोर
…. घराण्यात…… राव पुरुष थोर.
वसंत ऋतु आला, झाडांना फुटली पालवी
…. रावांच्या संगतीत….. काळ घालवी.
श्रावणाच्या महीन्यात जिकडे तिकडे पाणी
…… रावांच्या भेटीसाठी अतुर चातकावाणी.
चंदनाचा पाट, रुपयाचे ताट !
……. राव भुकेले, सोडा माझी वाट!
Smart marathi ukhane female
दारी होती तुळस, तिला घालीत होते पळी पळी पाणी
आधी होते आईबाबा ची तान्ही, मग झाले …. ची राणी .
पुण्यात जन्मले, गंगेत न्हाले !
आणि …. च्या साठी मुंबईत आले.
मोत्याचे पेले पाहून चंद्र सूर्य हासे
जमलेल्या मंडळीत ….. राव खासे !!
रुप्प्याची सरी, तिला सोन्याचा गिलावा !
……. सारखा भ्रतार मला जन्मोजन्मी मिळावा.
पिकल्या पानांच्या विडयांत बदाम घातले किसून
…..स विडा देते पलंगावर बसून.
मोत्यांचा चुडा करायला हिरेजडिताची पट्टी
घ्या घ्या … … सुंदर पानाची पट्टी.
सोन्याचा करंडा, त्यात मोत्याचा चुडा
घ्या ………… पाच पानाचा विडा.
marathi ukhane for female
सांबाच्या पिढीला बेल वाहिला हिरवागार
आणि……. च्या जीवासाठी केला संसार.
सोन्याची सुपली मोत्यांनी गुंफली
….ची रानी खेळायला गुंतली.
दारी होता कोणाडा त्यात होता पैका
….. चे नाव घेते ते सर्वजणी ऐका.
घरा दारास चंदनाचा लेवा
….. सारखा भ्रतार जन्मोजन्मी व्हावा.
गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले
…. च्या जीवासाठी पुणे शहर पाहिले.
तुळशीची माला विष्णूला वाहिली
……… च्या जीवासाठी मुंबई पहिली.
जडावाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
……. च्या नावा करिता एवढे का अडविले.
सौभाग्यवती चा अलंकार म्हणजे काचेचे चुडे
………. रावांचे नाव घेते मंगळागौरीपुढे.
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती
….. रावांशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.
शंकरासारखा पिता अन् गिरिजेसारखी माता
….. रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान.
अत्तरदाणी गुलाबदाणी विडे ठेविले करून
……. रावण माळ घातली कुलदेवतेचा स्मरून.
marathi ukhane for female
दरवळतोय घरात माझ्या अत्तराचा सुगंध
……. सहवास करतोय मला धुंद.
मखमली शेवजेवर अत्तराचे सिंचन
करते सदा मनामध्ये….. रावांच चिंतन.
श्लोक रामदासांचे आहेत किती छान
….. रावांच्या संसारात हरवले मी भान.
भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन
….. रावांच नाव घेते…… दादाची बहिण.
लांबसडक वेणी वर शोभे गुलाबाचे फुल
….. रावांना पाहताच पडलीये मला भूल.
चांदीच्या ताटात बेलापुरी साखर
…… राव भुकेले जाऊ द्या लवकर.
शिवाजी सारखा राजा गादीवर बसावा
….. चे नाव घेते आशीर्वाद असावा.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
…….. नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद