मैत्री कविता | Best Friend Kavita In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज मैत्री कविता friend Kavita ,best friend kavita, friend kavita in marathi या संधर्भात माहिती मिळेल.

Best Friend Kavita In Marathi

एक वेडी मैत्रीण
आहे बर का माझी
नेहमीच करत बसते
दुसर्र्याचीच काळजी
… … थोडीशी आहे अल्लड
थोडीशी नाजूक परी
प्रेमळही आहे खूप
जणू श्रावणातली
सारी पाणीपुरी खायला जाते
अन येते शेवपुरी खाऊन

निघते घरातून क्लासला
अन येते पिक्चर पाहून
देवा तिला नेहमी
सुखातच ठेवशील na
जन्मोजन्मी तिला माझीच
मैत्रीण म्हणून पाठवशील ना…

 

मुलींच सगळच कस विचित्र असत,
मनाच्या खोलीला मोजमाप नसत.

छोट्याश्या गोष्टी मनाला
लावून घेतात, चुकभूल मात्र
चटकन माफ करतात..

प्रत्यक्ष बोलायला मन
धजत नसत,फोनवर तसंतास
गप्पा मारण मात्र आवडीच असत..

मनातल्या हालचालींचा ठाव
लागत नाही, वागण्याचा अर्थ
जुळवता येत नाही..

किती ही गुंतागुंत असली
तरी खुप निर्मळ असत,.
अस एक मन आपल असाव,
प्रत्येक मुलाला वाटत असत…

 

मैत्री कविता

गर्लफ्रेँड कशी असावी?
.
.
मला विचारण्याआधी माझ्या आईची विचारणा करणारी!
.
.
तुझा भाऊ पागल आहे अस
माझ्या बहीणीला सांगणारी!
.
मित्रांनी चिडवलं तरी मनात लाजुन काय
हे?
.
अस मला हळु
आवाजात विचारणारी!
.
.
आपण स्वता: बनवुन
आणलेला डबा नकळत माझ्या बँगेत ठेवणारी!
.
.
लहान सहान कारणांमुळे माझ डोक खाणारी!
.
.
कधी कधी भांडुन तु पण
तसालाच अस सांगणारी!
.
माझा चेहरा बघताच
माझा मुड समजुन
घेणारी!
.
.
मला साथ देऊन
माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम
करणारी!

 

हसली की फसली असं मुलं समजतात,
येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात,
ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात,
उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात,
पण तेच बिच्चारे अन वेडे ठरतात,
जेव्हा मुली त्यांना मित्र आहे सांगतात,
मुलीच हल्ली मुलांना मस्त उल्लू बनवतात,
एकावेळी कितीजणांना वेडी आशा लावतात,
मुले नुसतेच मुलींना स्वप्नात घेऊन फिरतात,
म्हणूनच मुली अभ्यासात मुलांच्या पुढे असतात,
मुलांनी मुलींच्या मागे नुस्तच धावायचं नसतं,
तीच मन ओळखल्याशिवाय प्रेमात पडायचं नसतं,
प्रेमात पडलं तरी करियर बघायचं असत,
कारण त्यामुळेच तर जीवन सुंदर होणार असत……..

 

मैत्रीसाठी पुढे केलेला हात
कोणी मागे घेत नसतं ………. …
पण जीवनभर विश्वासने
साथ देणारा हात आपणच
आपलं शोधायचा असतो……
सावलीसाठी कोणी स्वताहून
आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात
सावलीसाठी एक झाड
आपणच आपलं शोधायचं असतं

Best friend kavita

ज्यांना मित्र असतील,
त्यांनी ते जपावेत…

ज्यांना मित्र नसतील,
त्यांनी ते शोधावेत…

मित्राशिवाय
जगण्याची वेळ
शत्रूवरही येऊ नये…

आपल्या तोडीचाच
किंवा त्यापेक्षा थोडा
वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर
असणारं फ्रेंड सर्कल
असणं ह्यासारखं दुसरं
भाग्य नाही…

आणि आपण मारलेला
एखादा पंच समोरच्याला
समजावून सांगायची
वेळ येणे ह्यासारखं
दुर्भाग्य नाही….

समोरासमोर
नसतांनासुद्धा
गप्पा मारताना
टाईप केलेल्या
वाक्यांमधून
हवा तो अर्थ
पटकन समजून…

त्याचा अजून
तिरका अर्थ
काढून बोललेलं
वाक्य तिसरीकडे
नेऊन ठेवणे,
ह्यातली मजा
अवर्णनीय आहे…

वयाच्या बंधनाला
अमान्य करून
वाह्यातपणा चालू
ठेवला, की…

बुद्धी ताजीतवानी
राहते आणि मेंदू
अखंड क्रिएटिव्ह
राहतो…

“अरे तुझं वय कांय,
बोलतोयस काय?”
हा प्रश्न ज्याला पडतो,
ती माणसं अकाली
वृद्ध होतात…

येता जाता केलेला
फालतूपणा हा
आपले हॅप्पी हार्मोन्स
अबाधित ठेवतात…

एखादी गोष्ट
सिरियसली न घेता
अतिशयोक्ती वगैरे
करून त्याची पार
वाट लावणं ज्याला
जमतं तेच खरे मित्र…!!

एकमेकांवर
कडी करून
मिष्किलपणाची,
बालीशपणाची
किंवा टारगटपणाची…

एवढच कांय थोडी
फाजिलपणाची हद्द
गाठणे, हेच खरं
जीवन….!!

बाकी सब मोहमाया…!!!

 

Friend kavita

कसा असावा आपला हक्काचा एक मित्र???

मित्र पाहिजे असा
कधी कधी तिढ्यात😏
कधी कधी कोड्यात😇
तर कधी गोडीत बोलणारा.🤠❤

मित्र पाहिजे असा
कधी सुख वाटणारा...
कधी दु:ख वाटणारा...
कधी समजून घेणारा...
तर कधी समजावून सांगणारा…

मित्र पाहिजे असा….
कधी आपलंस करणारा
कधी 😪अश्रु पुसणारा
तर कधी कधी हक्काने ओरडणारा..😠😠

मित्र पाहिजे असा
नेहमी 💝मन💝 जाणणारा…
सतत ❤ह्रदयात❤ बसणारा
तर कधी गालातल्या गालात हसणारा..😌☺

मित्र पाहिजे असा
योग्य ती वाट दाखवणारा🛣
तर कधी कौतुकाने पाहणारा🙀
संकटात 🤝🤝हात देणारा…

मित्र पाहिजे असा..
👄ओठावर 😊हसु आणणारा
कधी डोळे 👀👀वटारणारा
चुकलं तर 👂🏻कान👂🏻 धरणारा…

मित्र पाहिजे असा…
जीवाला जीव देणारा..
कधी 😏भाव😏 खाणारा
तर कधी भाव देणारा…😔😔

मित्र पाहिजे असा…
कधी तिखट बोलणारा...
कधी तिखट वागणारा..
कधी गोडी लावणारा…

मित्र पाहिजे असा…
मंजुळ पाव्यासारखा
दुधाच्या खव्यासारखा…
आणि
आयुष्यभर साथ देणारा..

मित्र पाहिजे असा…

Friend kavita in marathi

ती खूप गोड हसते,
कि हसताना ती खूप
गोड दिसते…

ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही…

ती हसताना,

मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो…

कारण,

हसताना तिचा
चेहरा असा खुलतो,

जशी गुलाबाची
एक काळी फुलते…

जशी गुलाबाची
एक काळी फुलते…

 

तुझ्यावरची मैत्री व्यक्त करण रोज मला जमत

नाही पण माझं मन खरंखरंच तुझ्याशिवाय रमत
नाही…! देण्या आणि घेण्याची बेरीज मैत्रीमध्ये
शून्य आहे, मैत्रीची ही गणिताची रीत म्हणूनच
मला मान्य आहे…! मी रुसावे अन् तू मला हसवावे
। तू रुसावे अन मी तूला हसवावे । असेच नाते आपूले
कायम असावे

Best friend kavita marathi

जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून
जा,
इतरांना नाही निदान मला कळवून
जा

 

“माझी प्रिय मैत्रीण”

तिचे नाव घेताच…
मन सहज हसते,☺️
नकळत तिची प्रतिमा
उघड्या डोळ्यासमोर दिसते.

तिच्या बद्दलचे प्रेम
मनात घर करून बसते,
प्रेमाची सुंदर ज्योत
मंद-मंद हसते..😍

तिचे स्मित हास्य,😊
मनी, स्वप्नात दिसते,
तिच्या भेटीसाठी मन
नेहमीच वाट पाहत असते.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद मैत्री कविता |Best Friend Kavita In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद  🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment