जीवनावर मराठी कविता | Marathi Poems On Life

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज प्रेरणादायी कविता मराठी, marathi poems on life, positive marathi poems on life, best marathi poems on life, marathi poem on life struggle, मराठी चारोळी आयुष्य,
आयुष्यावर कविता, कविता मराठी जीवन या संधर्भात माहिती मिळेल.

Marathi Poems On Life

जन्म दिनांकाच्या दिवशीच
मृत्यू दिनांक ठरलेला असतो
मधला काळ कसा जगायचा
ज्याचा त्यानी ठरवायचा असतो

इतरांवर टीका करत जगायचं
का जीवनाचा आनंद घेत जगायचं
हे आपलं आपण बघायचं

सोबत येतानाच
दुःख किती भोगायचं
सुख किती द्यायचं
सार ठरलेलं असतं

माणूस विनाकारण
विचार करत बसतं
असं कसं झालं ?
आणि तसं कसं झालं ?

तुमच्या अवती भवतीचे पात्र सुद्धा
किती चांगले , किती वाईट
कोण किती शिकणार ,
कोण कसं निघणार ?

हे सर्व
” आयुष्य ” नावाच्या नाटकातले सिन असतात
आपण फक्त आपला रोल करायचा
बस्स !

विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली
त्यात आपण बदल करू शकत नाही
हे नीट समजून घ्या
आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा

जग बदलण्याच्या भानगडीत न पडता
आयुष्य ” जगण्याच्या ” भानगडीत पडा
पुढचा माणूस असाच का वागतो ,
तसाच का बोलतो ,
अशा फालतू प्रश्नां वर विचार करू नका
तो त्याचा रोल आहे , त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत
त्याचा रोल त्याला करू द्या
तुमचा रोल तुम्ही करा.

” जीवन खूप सोप्प आहे “

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितकं थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…!!!

कविता मराठी जीवन

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेलं तर
रडणेही आपलं असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…!!!!

 

आयुष्य म्हणजे
पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं…!!!!

 

अश्रु नसते डोळ्यांमध्ये तर डोळे इतके
सुंदर असले नसते..!
दुःख नसते हृदयात तर
धडकत्या हृदयाला काही
किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर
भगवंताची काहीच गरज
उरली नसती..!!!!

 

आयुष्य पण हे
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते…..!!!!

 

आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा….!!!!

 

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….!!!!

 

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…..!!!!

 

हे पण वाचा 👇🏻

जीवनावर मराठी सुविचार

आयुष्य थोडसंच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की…
घेणार्‍याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचं ही भानं नसावं,
आयुष्य असं
जगावं की….
मृत्यूने ही म्हणावं,
“जग अजून,
मी येईन नंतर……….!!!!!!”

marathi poems on life inspiration

थोड जगलं पाहिजे………!!*

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

गजर तर रोजचाच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

गीतेचा रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
“बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
“फुलपाखराच्या” सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।।

आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई

मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
‘बातम्या नको,कार्टून लावा’
असा आमचा गलका असे

jivan kavita marathi

बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
‘खेळून झाल्यावर अभ्यास’
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला ‘वळण’ लावायच्या नादात
शेवटी घरातल्यांनाच ‘बाक’ येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
‘परीक्षा’ हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ५ ||

आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

आजच्या फोर व्हीलर long driveला
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whatsapp chatting ला नाही

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना…………

positive marathi poems on life

दोन शब्द जगण्याविषयी 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

कारण
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात….. माणसं !

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात….. माणसं !

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात….. माणसं !

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात….. माणसं !

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात …… माणसं !

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात …… माणसं !

नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
सारी असतात आपलीच माणसं !

best marathi poems on life

पूर्वीचा काळ बाबा,
खरंच होता चांगला,
साधे घरं साधी माणसं,
कुठे होता बंगला ?

घरं जरी साधेच पण,
माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी,
देवभोळी अन श्रद्धाळू.

सख्खे काय चुलत काय,
सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो,
आपुलकीने भेटायचे.

पाहुणा दारात दिसला की,
खूपच आनंद व्हायचा हो,
हसून खेळून गप्पा मारून,
शीण निघून जायचा हो.

श्रीमंती जरी नसली तरी,
एकट कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही,
कोणतंच काम रुकलं नाही.

उसनं पासनं करायचे पण,
पोटभर खाऊ घालायचे,
पैसे आडके नव्हते तरीही,
मन मोकळं बोलायचे.

कणकेच्या उपम्या सोबत,
गुळाचा शिरा हटायचा,
पत्रावळ जरी असली तरी,
पाट , तांब्या मिळायचा.

लपाछपी पळापळी,
बिन पैशाचे खेळ हो,
कुणीच कुठे busy नव्हते,
होता वेळच वेळ हो.

चिरेबंदी वाडे सुद्धा,
खळखळून हसायचे,
निवांत गप्पा मारीत माणसं,
ओसरीवर बसायचे.

सुख शांती समाधान ” ते “
आता कुठे दिसते का ?
पॉश पॉश घरा मधे,
” तशी ” मैफिल सजते का ?

नाते गोते घट्ट होते,
किंमत होती माणसाला,
प्रेमामुळे चव होती,
अंगणातल्या फणसाला.

तुम्हीच सांगा नात्या मध्ये,
राहिला आहे का राम ?
भावाकडे बहिणीचा हो,
असतो का मुक्काम ?

सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,
कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदंगाच्या ताला वरती,
गाव आता का डोलत नाही.

प्रेम , माया , आपुलकी हे,
शब्द आम्हाला गावतील का ?
बैठकीतल्या सतरंजीवर,
पुन्हा पाहुणे मावतील का ?

तुटक तुसडे वागण्यामुळे,
मजा आता कमी झाली,
श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,
सुदामाची सुट्टी झाली.

हॉल किचन बेड मधे,
प्रदर्शन असतं वस्तूंचं,
का बरं विसर्जन झालं,
चांगुलपणाच्या अस्थीचं ???

जगणं खूप सुंदर आहे,

त्यावर हिरमसू नका…

एक फूल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका…

सगळं मनासारखं होतं असं नाही,

पण मनासारखं

झालेलं विसरू नका…

सुटतो काही जणांचा हात नकळत,

पण धरलेले हात सोडू नका.

मराठी चारोळी आयुष्य

पन्नाशी झाली साठी आली
कशाला करतो चिंता ?
प्रत्येक दिवस मजेत जगायचा
वाढवायचा नाही गुंता

वय झालं म्हातारपण आलं
उगीच बोंबलत बसू नको
विनाकारण बाम लावून
चादरीत तोंड खुपसू नको

रोजच यांना कशी काय होती
जळजळ आणि Acidity
मलाच म्हणतेत या वयात
असते का कुठं सिमला , उटी ?

तुम्हीच सांगा फिरायला जायला
वयाचा संबध असतो का ?
नेहमी नेहमी घरात बसून
माणूस आनंदी दिसतो का ?

पोटा पाण्यासाठी पोरं
घर सोडून जाणारच
प्रत्येकाच्या आयुष्या मधे
असे रितेपण येणारच

करमत नाही करमत नाही
सारखे सारखे म्हणू नका
मित्रां सोबत दिवस घालवा
घरात कुढत बसू नका

आवडीच्या मित्र मैत्रिणींचा
Group करायचा मस्त
Sugar detect होई पर्यंत
Ice Cream करायचे फस्त

देशातल्या देशात वा परदेशात
हिंडाय-फिरायला जायचं
वय जरी वाढलं तरी
रोमँटिक गाणं गायचं

गुडघे गेले , कंबर गेली
नेहमी नेहमी कण्हु नका
आता आपलं काय राहिलं
हे बोगस वाक्य म्हणू नका

पिढी दर पिढी चाली रितीत
थोडे फार बदल होणारच
पोरं पोरी त्यांच्या संसारात
कळत नकळत गुंतणारच

तू-तू , मैं-मैं , जास्त अपेक्षा
कुणाकडूनही करू नका
मस्तपैकी जगायचं सोडून
रोज रोज थोडं मरू नका

एकमेकाला समजून घेऊन
पुढे पुढे चालावे
वास्तू तथास्तु म्हणत असते
नेहमी चांगले बोलावे

marathi short poems on life

माझे आयुष्य कसे गेले,
हेच कधी उमजले नाही l
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ll
लहानपणी जमवायचो,
सोबतीला सारे सवंगडी l
विटीदांडू, आबाधुबी अन्
चेंडूफली कधी लंगडी ll
खेळताना मात्र स्वतःचा,
कधी विजय पाहिला नाही ll१ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही……
तारुण्यातही मित्रांसाठी,
केल्या ब-याच भानगडी l
नको नको झंझटांमुळे,
विस्कटली जीवनाची घडी ll
दुस-यांसाठी केली लफडी,
स्वतःसाठी एकही नाही ll२ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही ……
मग घेतला झेंडा खांद्यावर,
बनलो पक्षाचा कार्यकर्ता,
तेथे माझा उपयोग केला,
फक्त निवडणूकी पुरता ll
आंदोलनाच्या केसेस् मात्र,
अजूनही मिटल्या नाही ll३ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
झाले लग्न माझे अन् ,
थाटला नवा संसार l
तेव्हापासून लागला मागे,
आणा-आणीचा बाजार ll
अपार कष्ट करुनसुध्दा,
संसार पुरा झाला नाही ll४ll
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
मुले शिकून मोठी झाली,
अन् लागली कमवायला l
मुलगी गेली जावयासोबत,
मुलगा सुनेबरोबर गेला ll
आम्हा म्हाताऱ्यांसोबत,
कुणीही राहिला नाही ll५ll.
कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही…….
वयानुसार शरीर थकले,
आता जडले अनेक आजार l
आम्ही म्हातारा म्हातारी,
परस्परांना देतो आधार ll६ll
आता समजलेही सारे,
पण आयुष्य उरले नाही……
आयुष्याच्या या प्रवासात,

कुणासाठी जीवन जगलो,
हेच मला समजले नाही………


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, जीवनावर मराठी कविता | Marathi Poems On Life हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद  🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment