बायकोवरील मराठी कविता | Bayko Marathi Kavita

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज marathi kavita bayko sathi, बायको (कविता), poem on wife marathi, marathi kavita on bayko, bayko var kavita marathi, बायकोवर कविता, marathi kavita mazi bayko, good poems in marathi on wife, happy wife day या संधर्भात माहिती मिळेल.

Bayko Marathi Kavita

💁 बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा 🙅‍
खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅

💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
🍃 पानही हालत नाही..
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही!💃

💁 नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय?🙆
तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय?🙇

💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡
बायकोमुळेच असतं..
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं! 😀

वय कमी असून सुद्धा
मुलगी समजदार असते..👩👱
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨
म्हणूनच जास्त असते!

💁तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते!
कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃🚶
दिवस रात्र धावते!

🙅 चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर?

बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका..😁
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका..🙇

💁बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा!🌸🌼🌺
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा!⚱

बायको म्हणजे सप्तरंगी🌈
इंद्रधनुष्य घरातलं!
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं!🎶

🙎नवरोजी 💁बायकोकडे
माणूस म्हणून पहा..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा..😷🙅‍

कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे🙋
तिच्या वाट्याचे एखादं कामं
आनंदाने झेलावे!🙆

poem on wife marathi

poem on wife marathi
poem on wife marathi

आता मी पाहुणी आहे….

मंगळसुत्र आणि जोडवे
या सगळ्यांमुळे नाही..
तर भरलेल्या बॅगमुळे
परके वाटते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

आई म्हणते अगं
हे बॅगमध्ये लगेच भर
नाहीतर जाताना विसरशील,
प्रत्येकवेळी काहीना काही विसरते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

माहेरी येण्याआधीच
परत जाण्याच्या बसचे
तिकीट बुक असते,
किती जरी सुट्टी असली
तरी ती कमीच पडते..
वाळुसारखी माहेरपणाची
वेळ निसटून जाते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

आता परत कधी येणार ?
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून
वाईट वाटते,
मन आतल्या आंत रडू लागते..
मग जबाबदारीची जाणीव होऊन
पुन्हा शहण्यासारखे वागते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

माझ्या माहेरच्या खोलीचा
कोपरा अनं कोपरा
फक्त माझा आणि
मी म्हणेल तसा असायचा
पण आता पंखा आणि
दिवा लावताना सुद्धा
बटणाचा गोंधळ उडतो..
प्रत्येक क्षण आता
मी पाहुणी आहे
हे जाणवुन देतो..

आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही
कारण तसं केलं तर कधीच
मी जाऊ शकणार नाही..
मग तसंच पाणवलेले डोळे
आणि गच्च भरलेली
बसमध्ये बसावे लागते,
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी
संपलेली असते..
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे
आपापल्या घरी जावे लागते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

poem on husband wife relation in marathi

poem on husband wife relation in marathi
poem on husband wife relation in marathi

🌹मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला 🌹👰

💠 मुली येतात माहेरी
आपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला….🌾🌾

💠 त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला…. 👬
त्या येतात आपलं लहानपण शोधायला….

💠 त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला….
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला….

💠 मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला….
कुणाची द्रुष्ट लागु नये म्हणून आपल्या घराला….🏠

💠 त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला….
त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं-थोडं प्रेम द्यायला….💚
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला….

 

💠 मुली जेव्हा परत जातात सासरी….
बरंच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी….
तीचे गोड हसणें आठवले कि नकळत….
सर्वांचे डोळे होतात ओले काठावरी….😪

💠 जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला….
खरंतर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला….
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला….

बायको कविता

नवरा-बायकोच्या नात्यांची
अलगद गुंफण करणारी कविता
काल वाचनात आली..

❤तो तिला म्हणाला “डोळ्यात
तुझ्या पाहू दे”..

ती म्हणाली “पोळि करपेल,
थांबा जरा राहू दे”…

💙तो म्हणाला “काय बिघडेल
स्वयंपाक नाही केला तर..?

”ती म्हणाली ”आई रागावतील,
दूध उतू गेल तर”..

👪“ठीक आहे मग दुपारी
फिरून येवू, खाऊ भेळ”

“पिल्लू येईल शाळेतून,
पाणी यायची तीच वेळ”

💑“बर मग संध्याकाळी आपण
दोघेच पिक्चर ला जावू”..

“नको आज काकू यायच्यात,
सगळेजण घरीच जेवू”…

💌“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”…

“बघा तुमच्या नादामधे
भाजी झाली तिखट”..

💏आता मात्र तो हिरमुसला,
केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा
माजघरातून मुसमुस..

💔सिगरेट पेटवत, एकटाच तो
निघून गेला चिडून…

डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून..

💓दमला भागला दिवस संपला
तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून
दोघांनाही कळेना…

💕नीट असलेली चादर त्याने
उगीच पुन्हा नीट केली..
अमृतांजन ची बाटली तिच्या
उशाजवळ ठेवून दिली..

💖तिनेच शेवटी धीर करून
अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर”..?
आणि तो विरघळला।

💗“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून
किती सिगरेट्स ओढल्यास सांग”..

💚“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव
जाळण आठवल…

💙अपेक्षांच ओझ तू किती
सहज पेललस सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

💛तुला नाही का वाटत कधी
मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा
तुझ्या जगात जावस”..

💜“बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…

💘माप ओलांडून आले होते,
तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का
विरघळलं”….

marathi kavita bayko sathi

सुजला डोळा बघून माझा…
बायकोला आली चक्कर,
विचारता मी उत्तरलो…
`स्कूटी ‘वालीने दिली टक्कर ।।१।।

बायकोने विचारले मला,
“अरे, नंबर पाहिलास गाडीचा?”
“‘नाही पाहू शकलो, पण…
लाल रंग होता साडीचा’ ।।२।।

‘गोरा-गोमटा रंग,
सडपातळ तिचं अंग;
मोकळे होते केस,
मी बघून झालो दंग’ ।।३।।

‘दोन बोटांत अंगठ्या,
लिपस्टिक तिची गुलाबी;
कानात लांब बुगड्या,
घारे डोळे, शराबी!!!’।।४।।

‘डाव्या गालावर होता,
छोटा काळा तीळ;
गाडी तिची घालत होती,
मोठ-मोठ्याने शीळ!!’ ।।५।।

वर्णन ऐकून तापला,
बायकोच्या डोक्याचा मजला…
दुसऱ्याच क्षणी गड्यांनो,
माझा दुसरा डोळाही सुजला।।६।।

बायका फारच हळव्या असतात….।

भडाभडा बोलतात…

घळाघळा रडतात…

खुदकन हसतात…

पटकन रुसतात….

आपल्या घराला जिवापाड जपतात….।

बायका फारच हळव्या असतात….॥

शब्द जिवास लावून घेतात…..
ओठांना शिवून घेतात…

बोलायचं ते बोलत नाहीत…

मनातलं सांगत नाहीत…

हवा पाणी, मुलंबाळं, घरदार ह्यांची आवड….
स्वयंपाकपाणी…
नवे पदार्थ……….

नको नको ते विषय काढून….,

नको तेव्हढं बोलत जातात…..

आतली सल दडवत जातात……

बायका फार हळव्या असतात…..॥

दुखलं खुपलं सांगत नाहीत…..

नको तेव्हढं सोसत जातात……

वर पुन्हा कुणीच दखल घेत नाही म्हणत –

रडत कुढत जातात…

 

marathi poem on my lovely wife

कुणाला नसलं बरं….
तर-
पदर खोचून सिध्द होतात…….

औषधपाणी खाणंपिणं
निगुतीने देत जातात…..

आई होतात,दाई होतात, सखीसारखं जपत जातात……

किती झिजतेस माझ्यसाठी…….

शब्द ऐकण्यास आतूर असतात…….

तिचे कष्ट गृहीत धरून कोणीच काही बोलत नाही…….

आपली कोणास किंमत नाही……

सल सलत जातो….
वाटते तिला फुलं देऊन,

माझ्या वाट्यास काटेच असतात…….

बायका फार हळव्या असतात…..

प्रेम जेव्हा करतात ना
तेव्हा जिवापाड करतात…….

आभाळ होतात,

धरणी होतात,

पौर्णिमेचा चंद्र होतात,

चांदण्याची शीतलता,

सागराची अथांगता,

झर्‍याची निर्मळता,

जीवनाला ऊर्जा देत,
सदैव झिजत असतात…….

बायका फार हळव्या असतात…..॥

घराची शान असतात,

कुटुंबाचा प्राण असतात,

तबांदिवडिवाय घराच्या भिंती खचतात….

छप्पर उडते…….

त्यांचा हात फिरला की घराचा स्वर्ग होतो….

प्रेम करतात जिवापाड,

फक्त एका गोड शब्दासाठी आतुरलेल्या असतात….।

बायका फार हळव्या असतात…॥

खंबीर असतात, गंभीर असतात…….

प्रेमळ असतात, अल्लड असतात…..

खर्च जरी केला तरी –

चार पैसे बाळगून असतात……..

जगण्याचा एक मंत्र सगळ्याच बायका जाणून असतात….

नवरे जरी गप्प बसले तरी आतून प्रेमळ असतात……

बायका सगळ्या हळव्या असतात……॥

आभाळाची सावली असतात…..
हिरवीगार पालवी असतात…..
माधवी बहर असतात,
वसंतातली झुळूक असतात,

बायका फार हळव्या असतात…॥

 

marathi kavita on bayko

“लाडके” कशासाठी गं तू
नवे नवे “कपडे” शिवतेस?
अगं.. जुन्या साड्यांमध्ये
तर तू “अप्सरा” दिसतेस!

💄👡💇
ब्यूटी पार्लरच्या चक्रात
खरोखर तू पडू नकोस
चंद्रासारख्या सुंदर शीतल
चेहऱ्याला तू कुठलीही
क्रीम लेपू नकोस!

🍎🍊🍏
अगं सफरचंदासारखे
गुटगुटीत गोरे गाल तुझे
पावडर क्रीमची गरज काय
एकदा सखे ऐक माझे!

🍲🍛🍪
हॉटेलच्या जेवणामध्ये
अशी कुठली चव आहे?
तुझ्या हातच्या स्वयंपाका
राणी “अमृताची” चव आहे!

💃💪🏃
“धुणीभांडी”वाल्यांच्या नादाने
तब्बेत नको खराब करू
हातात झाडू घेवून आता
दोघेही कसे व्यायाम करू!

💍🏅🔶
सोने चांदीचे अलंकार
कुरुपांसाठी बरे आहे
निसर्गसुंदर रुप तुझे
सोन्यापेक्षाही खरे आहे!

💶💰💴
“पैसापैसा” करू नकोस
तो तर “मोहलक्ष्मी” आहे
माझ्या घरच्या अंगणाची
तू खरी “धनलक्ष्मी” आहे!

💁🍆🍅
जेवणात तीन तीन भाज्या
काहींची सवयच ही प्यारी
एकाच तुझ्या भाजीला
प्रिये चव असते न्यारी!

💰👨‍👩‍👦‍👦🙋
राज्याच्या आर्थिक संसाराचे
शासनाचे तोकडे ग्यान आहे
कमी खर्चात घर चालवण्याचे
तुझ्याकडे खरे ज्ञान आहे

👹🌸🙂
नको बोलावू माहेरच्यांना
हे गाव भुतासारखे काटते
सुटीत जावू तुझ्या माहेरी
तिथे स्वर्गासारखे वाटते!

😌☺🙆
कुणा कशाचा तर
कुणा कशाचा अभिमान आहे
बायकोच्या काटकसरीचा
मला खरा स्वाभिमान आहे!

bayko var kavita marathi

हि कविता ज्याने कोणी लिहिली आहे त्याला सलाम….🐬🐬🐬
मूलगीची तक्रार

एकदा एका मुलीनं👩
तक्रार केली बापाकडे👴
मलाच का बंधने ??
जाऊ नको कुणीकडे….

का सारखे कपडयांवरून बोलणे👗
आणि माझ्या मित्रां बाबत नेहमी चौकशी करणे??….

का मीच उंबर्‍याच्या आत राहायचं,
आणि उठता बसता स्वतःला सावरायाचं…..

बाप बोलला,
बेटी म्हणणे तुझं पटतयं,
चल जरा बाहेर,
आत खूप उकडंतयं..

बाजारपेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं,
बाहेरच पडल होत अवजड सामान लोहाचं…..
बाप बोलला,
बेटी, हे ऊनपावसात इथंच असतं
तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसत.
किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं…

जरा पुढे जाताच,
ज्वेलरी💍 शाँप दिसलं
आत जाऊन मग बापाने हिर्‍याच मोल पुसलं,
तिजोरीतून बंद पेटी हळूवार पुढे मांडली,
त्याच्या झगमगाटात, नजरच दिपली…

सराफ बोलला किमती आहे,
फार जपावं लागतं,
जरा सुद्धा चरा पडता,
मोल याचं कचर्‍याच होत.

काळजी घेऊन खूप,
मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं,
तिजोरीच्या आत लपवावं लागतं…

फिरून घरी येताच बाप बोलला बेटी!
तूच तर माझी हिर्‍याची पेटी,
सांग तुला जपण्यात काय माझं चुकतं
तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं”…

“तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही,
तू म्हणजे अनमोल हिरा,
सांग चुकतं का काही…..

तुझ्यामुळेच घर प्रकाशित, आमचा तु अभिमान,
तुझ्यासाठी काळीज तुटतं,
तु आमचा जीव की प्राण”…

सर्व बघुन मुलीचे डोळे पाणवले,
बापापुढे झुकली मान शरमेने…
कळलं तिला सगळं,
मन तीचं हेलावल…

“बस्स! करा बाबा “
ऎकवत आता नाही,
तुमच्याकडे माझी तक्रार मुळीच नाही….
मीच मला आता,
जीवापाड जपेन,
हिर्‍याच्या तेजानं,
चौफेर चमकेन.”…💎

मुलगा मुलगी समसमान,
हे जरी असलं खरं,
पण आपल्या बहीण-लेकीला अधिक जपलेलेच बरं…

पटवून द्या तिला —
बेटी! तू हिरा आहेस,
आमच्या आनंदाचा तू झरा आहेस…
म्हणुन जपाव लागत 😌😌😌

good poems in marathi on wife

शॉपिंग ने बेजार करते कधी नवऱ्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते
कधी कोणाची गुपित सांगते कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते

बायको कशीही असली तरी वारच्याने बरोबर शोधून बेस्ट मॅच म्हणून
आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते

मानलं की थोडी सायको असते पण बायको म्हणजे बायको असते🌹😊

कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते कधी घरी यायची वाट बघत बसते
कधी सरळ सुत असते तर कधी संशयाचे भूत असते

कधी नवऱ्याला लगाम घालू पाहते कधी नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करते
कधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते

कधी न म्हणते की आज मी दामले, कधी ना संपणारी घराची ऊर्जा असते
कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते

 

बायको (कविता)

“बायको सुंदर मैत्रीण असते”

पारिजातकाचा सुवास बायको असते, निरपेक्ष प्रेमाचा सागर बायको असते, नवऱ्याची प्रेरणा बायको असते, जीवनाची अर्धांगीनी बायको असते, बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते,
सासूसासऱ्यास आई वडील मानते, नवऱ्यात परमेश्वर पहाते,
सारे आयुष्य सासरसाठी वाहते,
संसारात स्वतःलाही विसरते बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते
आल्या जरी असंख्य काटेरी वाटा, तरी ती धीराने सामोरी जाते, नवय्राच्या सुख दुःखात साथ देते, घराची ती तुळस होते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते
कधी हसते, कधी रुसते,
कधी उगाच रागानी पहाते,
कधी आसवांच्या सागरात,
नवऱ्यासोबत भिजते,
कधी सुखाचे चांदणं टिपते,
खरंच बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते,
सासरचे गुण जगभर गाते,
बायकोच सांभाळते सर्व नाते,
घरात स्वर्ग तिच करते,
मनातील दुरावे तीच संपवते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
माहेराच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते,
मनातील दुःख तिचे कोणी का जाणते?,
संसारास तीच्या अमूल्य मानते,
प्रत्येक जन्म ह्याच संसारासाठी मागते,
बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते
तिच्या मनात साऱ्यांसाठी आपुलकी असते,
सुखी संसाराचे ती मनोरे रचते,
माहेर सोडून परक्या दारी येते,
सासरला ती आपले करते,
बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते,

love poem on wife in marathi

कधी नवऱ्या साठी साज शृंगारात सजते,
अबोलीचा गजरा केसात माळते,
आरश्यास घडी घडी सुंदर असल्याची साक्ष मागते,
नवर्याच्या एका स्पर्शानेच ती मोहरते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
नवऱ्यास गुण दोषा सह स्वीकारते,
पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे कोडे तीच सोडवते,
थोड्या मायेची अपेक्षा ती ठेवते ,
नवऱ्याच्या डोळ्यात केवळ प्रेम शोधते,
बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते,
नवऱ्याचे नवरेपण तीच सोसते,
मनात दुःख लपवून जगासमोर हसते,
तिची किंमत त्याला तेव्हाच कळते,
जेव्हा ती त्याच्या सोबत नसते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
बायको तर मैत्रीण होऊन जाते,
पण नवरा कधी मित्र होत नाही,
का नवरा बायकोच्या नात्याला
तो मैत्रीचे नाव देत नाही?,
पण बायको ह्या नात्यातील मैत्रीला असचं जपते,
कारण बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते,
मुलगी बहिण सून आई ची ती सर्व पात्रे साकारते,
नवऱ्यासाठी मात्र बायकोच्या पात्रातून मैत्रीण होते,
पण नवरा कधी नवरेपण का सोडत नाही?,
तिच्या सारखे तो तिचा मित्र का होत नाही?,
त्याला का ते उमजत नसते ,
बायको बायको नाही,
एक सुंदर मैत्रीण असते,
हातात हात घेऊन तिच्या सोबत चालावे,
तिच्या सहवासात त्यानेही फुलावे, तिच्या आसमंत प्रेमात त्यानेही झुलावे, तिच्या सारखे प्रेम मग त्यानेही करावे, इतकेच स्वप्न ती बघते, बायको बायको नाही, एक सुंदर मैत्रीण असते,
एक दिवस नवरेपण सोडून द्यावं,
एक दिवस का होईना तिचा मित्र बनून पाहावं,
मग कळेल प्रत्येक क्षण आहे नवा,
तिच्या सोबत हा क्षण असाच राहायला हवा,
प्रेमात मग त्याच्या ती नव्याने पडेल,
आणि मग ती बायको बायको नसेल ,
त्याचीच सूंदर मैत्रिण झालेली असेल.

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, बायकोवरील मराठी कविता | Bayko Marathi Kavita हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment