लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes in Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा, lagnacha vadadivasachya shubhechya marathi या संधर्भात माहिती मिळेल. 

Marriage Anniversary Wishes in Marathi

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.


प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधुरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा
लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा


कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही …
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

wedding anniversary wishes in marathi images
wedding anniversary wishes in marathi images

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे, सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


लग्नाच्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा HAPPY Marriage Anniversary

 


साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 🎂


🎂 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂


बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Marriage Anniversary Wishes to Wife in Marathi

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…


आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, माझे सुंदर आयुष्य आहेस तू,माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…


अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , लग्नाचा वाढदिवस | Marriage Anniversary Wishes in Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button