तुळशी विवाह शुभेच्छा | Tulasi Vivah Wishes Quotes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज tulasi captions marathi, tulsi vivah quotes in marathi, तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, Tulsi Vivah Wishes in Marathi, तुलसी विवाह marathi sms, tulasi vivah sms in Marathi, quotes, status, shayari, kavita, tulasi vivah captions, festivals, wishes, greetings, messages in marathi.

Tulasi Vivah Wishes Quotes In Marathi

अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस, हिच आहे महाराष्ट्राची ओळख.. कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख.. माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

सॉरी Friends, I Am Very सॉरी..!! लग्न इतक्या गडबडीत ठरलं, आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!! त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय, ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत पत्रिका पोहचो न पोहचो तरी हेच निमंत्रण समजुन तुम्ही या…. लग्नाची तारीख आहे, संध्याकाळीः 7.20 वा.. . . . . आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!

हे पण वाचा 👇🏻

दिवाळी शुभेच्छा मराठी

आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान.. अंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास.. मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी.. आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

🙏🙏🎤🎤🎤थोड्याचा वेळात कृष्णाच्या आणि तुळशीच्या लग्नाला सुरूवात होत आहे🕕 तरी💐🌹👫👫 तुळशीच्या मामा-मामीने 🎋ऊसाच्या मंडपात तुळशीला घेऊन हजर रहावे🎋💐🌹

💐हि नम्र विनंती 💐 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
कृपया जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये 🙏🙏

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

तुळशी विवाहामागील अर्थ
🌿🌿🌿🌿

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच
‘तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी ।’ देवाला पूर्णपणे वरण्याची
क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही.
देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत
आहे. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण
हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह
पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस
या गोष्टींचे प्रतीक आहे.

आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी
त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र
सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक
महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना
तेजाने प्रकाशमय करतात. तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून
देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत
पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात
देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते
देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो.

म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक
आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू
या!


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , तुळशी विवाह शुभेच्छा | Tulasi Vivah Wishes Quotes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment