माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज poem on mother in marathi,माझी आई कविता,mother in marathi,aai in marathi,short poem on mother,आई वर कविता,marathi kavita aai,marathi mazi aai marathi lekh,small poems on mother in marathi,माझी आई

Poem on Mother in Marathi

एक सुंदर कविता आई साठी

स्वयंपाक करायला आई हवी
गरम जेवण वाढायला आई हवी

अभ्यासात मदतीला आई हवी

“तुला काही कळत नाही,”
ऐकून घ्यायला आई हवी

खरेदीला जाताना आई हवी

निवड करताना आई हवी

नसतानाही “राजपुत्र ” म्हणायला आई हवी

गालावरून हात फिरवायला
आई हवी

मनासारखं घडवायला आई हवी

बाबांना समजवायला आई हवी

ओरडा खाताना आईच हवी

पदरामागे लपायला आई हवी

आपली बाजू सावरायला आई हवी

पाठीवरून हात फिरवायला
आई हवी

कँरमचा चौथा मेंबर आई हवी

पत्ते खेळताना ही आई हवी

बुद्धिबळात भिडू म्हणून आई हवी

भूक लागली की आई हवी

पडल्यावर सावरायला आई हवी

लागलं खुपलं आईच् हवी

मन मोकळं करायला आई हवी

न बोललेलं कळायला आई हवी

बाबा नि माझ्यात सेतु म्हणून
आई हवी

माझ्यावाटची बोलणी खायला
आई हवी

माझी बाजू मांडायला आई हवी

माझी बाजू पटायलाही आईच् हवी

परिस्थितीचा राग काढायला
आई हवी

तुझ्यामुळे घडलं सारं
ऐकायला आई हवी

रागराग करायलाही आई हवी

निरपेक्ष प्रेम शिकवायला आई हवी

पहिलं प्रेम न सांगता कळायला
आई हवी

डोळ्यांतलं समाधान कळायला
आई हवी

एकटेपणात सांभाळून घ्यायला
आई हवी

नजरेने आधार द्यायला आई हवी

“मी आहे रे “, …
विश्वास द्यायला आई हवी..

हे पण वाचा 👇🏻

प्रेम कविता मराठी

जेव्हा मी मोठा होईन
आणि माझी मुलगी मला विचारेल
कि, बाबा, तुमचे पहिले प्रेम
कोण होत ?
… तेव्हा मला कपाटातून जुने
… फोटो काढून दाखवायचे
नाही आहेत, मला फक्त
माझा हाथ वर करून बोटाने
दाखवायचे आहे कि, ती किचन
मध्ये उभी आहेना तीच माझे
पहिले आणि शेवटचे प्रेम आहे

aai in marathi

आयुष्याच्या तव्यावरती
संसाराची पोळी
भाजता भाजता
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही…
🖤
नवर्‍यासह लेकराबाळांचे
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले ,
आईने मोजलेच नाही…
💚
जरा चुकले की
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली , आईने मोजलेच नाही…

याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी
किती जगले ,आईने
मोजलेच नाही…
💙
पाखरे गेली फारच दूर
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर ,आईने
मोजलेच नाही…🦋

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.
.

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.
.

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.
.
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं ‘कुलभूषण’
पोरकी मी का झाले?
.
.

आता माझ्या थडग्यापाशी
‘आई’ म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

marathi poem on aai

आई म्हणायची ‘श्री’ लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं ‘कृष्णार्पण अस्तु’,
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.

aai poem in marathi | आई वर कविता

त्यांना कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .

तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..

तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.

त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”

त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment