New Marathi Suvichar | 100+ नविन मराठी सुविचार आजचा सुविचार

MarathiStyle.com daily update new marathi suvichar sms sangrah,navin marathi suvichar,lahan marathi suvichar,aajcha suvichar, marathi,whatsapp suvichar marathi,anmol suvichar marathi,marathi thoughts on success.

New Marathi Suvichar

 • अंथरूण बघून पाय पसरा.
 • अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही .
 • अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
 • आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे.
 • उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
 • उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
 • उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
 • ऎकावे जनाचे करावे मनाचे.
 • एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
 • एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
 • कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते .
 • केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
 • खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय.
 • खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
 • खिडकी म्हणजे आकाश नसतं.
 • गरजवंताला अक्कल नसते.
 • गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
 • जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
 • जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
 • जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो, तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते.
 • जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
 • जे खरे आहे तेच बोलावे.
 • जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
 • ज्ञान म्हणजे काय? इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार.
new marathi suvichar
new marathi suvichar

आजचा सुविचार

 • ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
 • झोपतांना दिवसाचा आढावा घ्या.
 • तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
 • तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे, हे तुम्ही किती माकड पणा करता , त्यावर अवलंबुन असत .
 • तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
 • निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…
 • न्यायाची मागणी करणार्‍याने स्वतः न्यायी असले पाहिजे.
 • पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
 • पुस्तक म्हणजे खिशातील बाग.
 • तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
 • निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…
 • न्यायाची मागणी करणार्‍याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

हे पण वाचा 👇🏻

आत्मविश्वास वाढवणारे सुविचार

 • फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
 • मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
 • मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
 • यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे.
 • रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
 • रिकामे मन कुविचाराचे धन
 • लबाडी ही एक आखूड चादर आहे, ही तोंडावर घेतल्या पाय उघडे पडतात.
 • वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
 • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
 • विद्या विनयेन शोभते ॥
 • व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .
 • व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
 • शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
 • शुद्ध चरित्र्य नसताना मिळविलेले बौद्धिक ज्ञान म्हणजे श्रृंगार आहे.
 •  शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!
 • सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

सुविचार मराठी सुविचारांचा संग्रह

 • स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो.
 • हसा, खेळा पण शिस्त पाळा.
 • हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
 • नवं काहीतरी शिकण्यासाठी ‘मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी
 • माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो… मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो…
 • योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हि जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे
 • खटला जो वकील जिंकत नाही ज्याचे सर्वात जास्त कायदे पाठ आहेत तर तो जिंकतो ज्याने खटल्यासाठी उपयोगी असलेल्या कायद्याचा अभ्यास नीट केलाय
 • चालुन पाय दुखायला नको म्हणून डोक चालवतो तो खरा माणुस
 •  मागता मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे समस्या
 • पुर्ण ते आहे ज्याला प्रारंभ, मध्य आणि अंत आहे
 • अश्रु येण हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे
 • स्वत:च्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी मनुष्य दुसऱ्यांच्या त्रुटींकडे लक्ष देतो
 • तुलना करावी पण अवहेलना करू नये
 • इतरांमुळे आपल्याला त्रास झाला तर इतरांनाही आपल्यामुळे त्रास होऊ शकतो
 • निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण
 • अपयश दोन प्रकारे येऊ शकत – कुणाचच न ऐकल्याने किंवा सगळ्यांचच ऐकल्याने
 • स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं…काही कमी पडत नाही
 • स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल
 • पगाराला दोनने गुणले तरी अनेकदा भागत नाही
 • शब्दांपेक्षा शांत राहुनच अनेकदा आक्रमक होता येत
new marathi suvichar sms
new marathi suvichar sms

Navin marathi suvichar

 • प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या कट्या-कुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही
 • श्रद्धेची मुळे हृदयात असतात जिभेच्या टोकावर नसतात
 • तुम्हांला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा, यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही
 • या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते…. तुमच्या जवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब
 •  जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ठ व्यक्ती म्हणून जळत असते
 •  त्याच व्यक्तींची काळजी घ्या, जे त्यासाठी पात्र आहेत…. कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आपण जोकर नाही ना …!!!
 • किती मजेशीर आहे ? दिवसचे दिवस जातात आणि काहीच बदलत नाही. मग एखाद्यादिवशी मागे वळुन बघितला तर सगळंच बदललेलं दिसतं
 • तुमचा भाऊ तुम्हाला कदाचित कधीच i love म्हणत नसेल पण या जगात जर कुठला मुलगा तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असेल तर तो फक्त तुमचा भाऊच असतो
 • नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरीही सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
 •  संवाद हा दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला कि त्याच्या गप्पा होतात
 • आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही…. म्हणुन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा …
 • गरजेपेक्षा जास्त चांगले झालात तर…. गरजेपेक्षा जास्त वापरले जाल
Good morning marathi suvichar
 • जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं
 • आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल
 • काही जण आश्या लोकांन वर प्रेम खर करतात ज्यांना प्रेम म्हणजे एक टाइमपास वाटतो आणि जो प्रेमाचा कदर करतो त्याला प्रेम देणारे कोणच नसते
 • जे तुमची काळजी करतात त्यांना कधीही दुर्लक्षित करू नका कारण गारगोट्या जमा करण्याच्या नादात तुम्ही “मौल्यवान हिरे ” गमवाल
 • बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नव्हे, पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडातून नव्हे
 • दही हंडी हा एकच असा उत्सव आहे कि ज्यामध्ये मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय खेचत नाही… तर त्याला वर जाण्यास मदत करतो
 • पुस्तकांच्या शिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे “आयुष्य “
 • “आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो.. फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी असते…..”
 • एक तरी मैत्रीण असावी, जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा . तुमचा सुधा खांदा कधीतरी तिच्या दु:खानी भिजावा.
 • छोट्या छोट्या चुकांमुळे नका सोडू आपल्यांची साथ, आयुष्य निघुन जात आपल्यांना आपलं करता करता ….
Marathi thoughts on success
 • जेव्हा कोणी तुमची आठवण गरज पडल्यावर काढतात तेव्हा वाईट वाटुन घेऊ नका कारण मेणबत्तीची आठवण अंधार झाल्यावरच येते
 • आपलं घरट सोडुन बाहेर गेल्याशिवाय, पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही
 • नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवू नये
 • रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ….! त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असाव लागतं
 • नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र निवडलेला असतो, कारण कधी न कधी प्रत्येकजण एकदातरी प्रेमात पडलेला असतो…..
 • तुमचं स्वप्न ऐकून कोणी हसलं नाही तर समजा तुमचं स्वप्न खूप छोट आहे
 • आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही
 • डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणुन काळजी घेता तशी काळजी नळातून पाणी वाया जाऊ नये म्हणून घ्या
 • शरीराने बरोबर असणे, हि फक्त सोबत असते…. मनापासुन दिली तरच, ती खरी साथ असते
 • ‘अंत’ आणि एकांत ह्यापैकी आपण एकांतालाच जास्त घाबरतो
 • एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैर समज दूर होतील
 • सुंदर माणूस चांगला असेलच असे नाही पण चांगला माणुस नेहमीच सुंदर असतो
 •  माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची
 • कुणाची मदत करताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , New Marathi Suvichar | 100+ नविन मराठी सुविचार आजचा सुविचार हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button