शाळा विषयी कविता | Mazi Shala Marathi Kavita

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज mazi shala marathi kavita, chandra varchi shala kavita, marathi kavita shala poems, shalevar kavita in marathi, शाळा विषयी कविता, marathi poem on my school, शाळेवर कविता या संधर्भात माहिती मिळेल.

Mazi Shala Marathi Kavita

प्रिय शाळेस…ओळखलस का मला… एके काळी तुझ्याच अंगणात खेळलेला, बागडलेला मी तुझा एक माजी विद्यार्थी… तुझ्या सहवासात असतांना तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली… पण, आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहित आहे… कारण, मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येणार नाही…

१० वी च्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो पण, त्यावेळी त्याच इतकसं दुःख मला जाणवलं नव्हतं कारण, ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका होणारं… आता आकाशात मी स्वच्छंद भरारी घेणार… या कल्पनेनच मी सुखावलो होतो…

पण तुला सांगू का… या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होतेय…

मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय…
पाठीवर दप्तर घेउन तुझ्याकडे यायचंय…
ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायचीय…
आणि फळ्यावर सुंदर अक्षरात एक सुविचारही लिहायचाय…

विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहायचेत…
बैजिक राशी अन् भूमितीची प्रमेयं सोडवायचीत…
मंत्रमुग्ध करणारा इतिहास ऐकायचाय…
आणि हो मराठीचं व्याकरण, संस्कृतातली सुभाषितं सुद्धा शिकायचीत…

मधल्या सुट्टीतला पोषण आहार, आणि मित्रांचा डबा खायचाय…
पीटीच्या तासाला मनसोक्त कबड्डी, खो-खो खेळायचंय
ग्रंथालयातली गोष्टीची छान पुस्तक वाचायचीत…
आणि एखाद्या मोकळ्या तासाला बाकावर कान ठेवून तबलाही वाजवायचाय…

स्वातंत्र्य दिनाला स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायचंय…
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय…
निबंध स्पर्धेतही पहिला नंबर मिळवायचाय…
आणि, नाट्यवाचनाच्या स्पर्धेत तुझ्यासाठी बक्षीस आणायचंय…

शाळेवर कविता

विज्ञान प्रदर्शनासाठी एक ‘भन्नाट’ प्रकल्प करायचाय…
शरद मल्हार महोत्सवात समूहगीत गायचंय…
वार्षिक स्नेहसंमेलनात नाच करायचाय…
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एकदो करतही चालायचय…

सहलीला जाऊन नुसती धम्माल करायचीय…
परीक्षेच्या आधी खूप सारा अभ्यास करायचाय…
आणि पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय…

खरतरं मला तुझ्या सानिध्यात घालवलेल्या एकूणच क्षणांची पुनरावृत्ती करायचीय… तुझ्या सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत… यासाठी तू मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?

निरोप समारंभाच्या वेळी मुख्याध्यापक सर म्हणाले होते “तुमचे शाळेतले दिवस हे सुवर्णाक्षरात कोरलेले दिवस आहेत.. कितीही किंमत मोजलीत तरी ते तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत…”
त्यामुळं तुझ्यासोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण माझ्या वाटेला परत येणार नाहीत… याचीही मला अगदी पुरेपूर जाणीव आहे…

पण, मला तुझे मनापासून आभार मानायचेत… या समाजाच्या अथांग आकाशात झेप घेण्यासाठी तू माझ्या पंखांना बळ दिलेस… माझ्यातील नीतिमूल्यांचा तू आविष्कार घडवलास… माझ्यात जे काही चांगल आहे हे तुझ्याचं संस्कारांचं देण आहे… आणि याकरिता मी तुझा सदैव कृतज्ञ राहील…

माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक यशातून मी तुझे नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल…

तुझा आजन्म ऋणी असलेला एक माजी विद्यार्थी🙏🏻😊

 

हे पण वाचा 👇🏻

गौतम बुद्धांचे चांगले मराठी सुविचार

chandra varchi shala kavita

chandra varchi shala kavita
chandra varchi shala kavita

शाळा होती माझी
खो मिळाला तुमचा
चिकाटी होती माझी
म्हणून डोळा होता तुमचा

सुंदर सजली शाळा माझी
म्हणून पहिली पसंती तुमची
ओढ होती मुलावर माझी
पट छान म्हणून निवड तुमची

उपक्रमाची खैरात होती माझी
म्हणून पहिली निवड तुमची
गुणवत्तेत पुढे शाळा माझी
म्हणून मर्जी, झाली तुमची

मिळेल शाळा तीही होईल माझी
राहुद्या आमची करा शाळा तुमची
जिथं कमी तिथं आम्ही
संवर्ग ४ वर मर्जीच आहे सर्वांची

शासनाचा,बदली आदेशाचा करू
नेहमीच मनापासून आदर
जिथं जाऊ तिथं अप्रतिमच करू
कारण मी नाही करणार तर कोण करणार?

marathi poem on my school

वासांची शाळा..

पुर्वी प्रत्येक महिन्याला वास होता…
त्या वासातच माझ्या बालपणीचा श्वास होता…

पहिला महिना जुनचा…
नविन युनिफॉर्मचा वास,
नविन वह्यापुस्तकांचा वास,
नव्या गमबूटांचा वास,
पेन्सील खोडरबराचा वास….

मग जुलैला पावसाचा दणदणाट..
डब्यातल्या भाजीपोळीचा घमघमाट,
चिखलाच्या वासातून घरची पायवाट
शाळेच्या भिंतींनाही घामाचा वास…

ऑगस्टला विविध राख्यांचा स्पर्श..
तरूण उन्हातील
तेरड्याच्या फुलांचा रंग…
शाळेच्या वाटेवर मित्रमैत्रिणी दंग..

सप्टेंबर ला काकड्या पपनसाचा वास…
गणपतीच्या शाडूचा खास…
उदबत्या भरजरी मखरांचा वास..
करकरणार्या थर्माकोलचा कानाला त्रास…

ऑक्टोबरला उटण्यांची पहाट..
फटाक्यांच्या धुराची हवा दाट..
करंज्या चकल्यांच्या वासाने
नाकाला गुदगुदल्या खास…

नोव्हेंबरच्या सुट्टीत
कॉमिक्स ,चांदोबाच्या
पिवळ्या पानांचा वास…
लायब्ररीजवळच्या गटाराचाही त्रास..

डिसेंबरला लडीवाळ झुंजूमुंजू..
गोदडीला खूपवेळ झोंबू..
गार सकाळी गरम पोहयांचा वास..
गरम पाण्यालाही होता स्पर्श खास..

जानेवारीचा तिळगूळ
आणी बाई आई मावश्यांचे सजणे..
शालूंचा दर्प, गजर्याचा घमघमाट..
हिरव्या बांगड्याचा सळसळाट…

फेब्रूवारीच्या परिक्षा..
प्रश्नपत्रिकेची शाई, उत्तरांची घाई..
फाऊंटन पेनाचा वास..
रस्तावरच्या लिंबूसरबताची आवड खास..

मार्चला क्रिकेटच्या मॅचा…
सुट्टीतल्या रिकामटेकड्या बाता…
गच्चीवर कूरडयांच्या चोर्या…
पिकलेली जांभळे आणी कैर्या..

एप्रिल तसा टेंशनचा…
रिझल्टच्या दिवशी बाकांचा वास नकोसा…
सगळी सुट्टीची मजाच जाई..
कमी मार्कांमुळे कुणाची मान खाली जाई..

मे म्हणजे मरण..
सावल्यांमध्ये बसून बैठे खेळ
घरोघरी लोणची पापडांचे मेळ..
गावी गेलो तर पुढे सरकेच ना वेळ..

आला जून की ढगांचा वास…
हवेचा खास…
नव्या इयत्तेत बाई कोण असतील
त्या कश्या हसतील..
ही उत्कंठा मनातील..

अशी शाळा दहावीपर्यंत…
आपण जगलो…
नाकाने डोळ्यांनी..
मन तसे आता ना राहिले
ना तशी वासांची जुगलबंदी..


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, शाळा विषयी कविता | Mazi Shala Marathi Kavita हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻


Leave a Comment