दर्जेदार विनोद | Marathi Vinod

Marathistyle.com daily update मराठी विनोद,मराठी चावट विनोद,मराठी विनोद जोक्स,marathi vinod jokes,chavat marathi vinod,whatsapp marathi vinod,मराठी जोक्स विनोद,नवीन मराठी विनोद,मराठी विनोद लहान मुलांसाठी,शाळेतील विनोद.

दर्जेदार विनोद

Marathi Vinod

दया : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ? वैभव : काल यार बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत…. दया :😂😂 मग आज मूड ऑन कसा…? वैभव : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय…..!!

STATE BANK OF INDIA आणि LIC चे joint venture…
..
.
.
….
SBI…..
रांगेत शेवटपर्यंत ” टिकलात ” तर पैसे ” आम्ही ” देऊ..
LIC…..
नाही ” टिकलात ” तर ” आम्ही ” देऊ..

खानदेशचे पती पत्नी मधील हे प्रेमळ संवाद …………. आमच्या पुढे जे ताटात येईल ते आम्ही जेवतो बाबा ……… पण इथे हे लाड बघा ………..

नवरा :- जेवाले काय बनावशी ?
बायको :- तुम्ही सांगश्यात ते बनावसू….. !

नवरा :- कर, वरण भात पोया…
बायको :- ते ते कालदिनच करेल व्हतं …

नवरा :- बेसण कर तावावरलं…
बायको :- पोरे खातस नई ना ते…

नवरा :- वटाणास्नी चटणी कर…
बायको :- ती पचाले जड जास…

नवरा :- तुले जे आवडस व्हई ते बानाव …
बायको :- तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !

नवरा :- आंडा कर मंग…
बायको :- काही वाटस का, सोम्मार शे आज…

नवरा :- आरे हा, धिंडरा कर मंग…
बायको :- त्यासना भलता कुटाणा पुरस…

नवरा :- तोरनी दायन्या चिखल्या बनाव..
बायको :- तोरनी दाय ते कालदिनच सरनी…

नवरा :- मंग मॅगी बनाई टाक…
बायको :- हाट, ते का जेवण शे का?

नवरा :- मंग काय बनावशी…
बायको :- तुम्ही सांगश्यात ते…

नवरा :- आसं, कर खिचडीच बनाई टाक …
बायको :- नको ,नुसती खिचडी खाई खाई कटाया येत नही का?

नवरा :- काय बनावशी मंग
बायको :- त्येच ते सांगी राहिनू, तुम्ही सांगश्यात ते बनावसू…

नवरा :- आसं कर, आपण जेवाले बाहेर जाऊत….
बायको :- नको, बाहेरनं खाईसन भलता त्रास व्हस तुभ्हले….

नवरा :- (नवरा मन् मा नी मन् मा, इनी मायनी भूखे भूखे मारी की काय आज?..)
बायको : फोनवर : काय व्हयनं ? काहीतर बोला,

मराठी चावट विनोद | chavat vinod

मराठी चावट विनोद | chavat vinod
मराठी चावट विनोद | chavat vinod

नवरा :- शांत…
बायको :- (मन् मा नी मन् मा फोन कट व्हयना की काय? …..)

नवरा :- दख, तुले जे पटी ते बनाव
बायको :- सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू…

नवरा :- घरमा दुध शे का ? पाव बिव खाऊत त्याना बरोबर….
बायको :- तुम्ही ते कायभी सांगतस पावसवर काय पोट भरस?

नवरा :- नुसता भात बनाव मी येवाना टाईमले दही लई येस…
बायको :- नको, दहीनी सर्दी व्हस तुम्हले…….

नवरा :- मंग पोरेसले जे आवडस व्हई ते बनाव…
बायको :- पोरे ते कायभी सांगतीन, तो काय खे शे का?

नवरा :- आते तूच दख, तुले पटी ते बनाव, मनी आक्का……….
बायको :- आसं नका, तुम्हीच सांगा ना, तुम्ह

हे पण वाचा 👇🏻

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद

भारतात
ज्ञान वाटणा-या
महान टाँप ४ युनिवर्सीटी..
१. WhatsApp

२. पानटपरी
३. कटिंगचं दुकान
४. दारू पीलेला माणुस..
बाकी शाळा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे

Vinod  sms

मास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का
झाला तुम्हाला..?
.
गण्या : गुरुजी काल रात्री
स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..
.
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??
.
पप्या : गुरुजी, मी गण्याला
आणायला एअरपोर्ट वर गेलेलो…
खुप धुतले राव मस्तरन

आयला… नाव एवढा ख़राब झालाय की…
उपवासाला चिवडा-वेफर आणायला गेलो तरी दुकानदार विचारतो…
आजतरी उपवास धरा।।।

Marathi vinod jokes | दर्जेदार विनोद

गोल्या : गण्या मले सांग,उत्तरपत्रिकेत सर्वात
अगोदर काय लिहू बे…????😳😳😳
गण्या : लिही कि,”या उत्तर पत्रिकेत लिहीलेली
सर्व उत्तरे काल्पनिक आहेत,यांचा
कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध
नाही आणि जर काही संबंध आढळून
आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा… “

लग्नात कुवारे…
आणी
अंतयात्रेत म्हातारे…
.
सर्वात जास्त का जातात कारण…
.
.
दोघांना एकाच गोष्टींची चिंता असते…
.
.
.
.
.
.
मी नाही जाणार तर,
माझ्या वेळी कोण येणार… !!!

फुलटू आगरी इश्टाईल !
देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १ काॅपी कितीला ह ?
वेटर : २० रुपे
देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ?
वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.

बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
कितीही प्रयत्न केला तरी , आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही !

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!

Whatsapp Marathi vinod

पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, ” पक्या परिक्षेची तयारी झाली का ?”

पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.”

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!

१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो…!!!

गोलू: २० लाख…!!!

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला
.
.
.
.
… .
.
.
.
.
“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
.
.
.
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?

whatsapp Marathi vinod

एकदा एक लग्नाळू मुलगा मुलगी पाहण्यासाठी जातो.

प्राथमिक सोपस्कार (म्हणजे खोटे खोटे स्वागत ,चहापाणी , कांदेपोहे ईत्यादी इत्यादी) पार पडल्यानंतर मुला मुलीला थेट बोलायची संधी मिळते.

नव्या जमान्याप्रमाणे मुलगी जरा फॉरवर्ड असते तीच संभाषणाला सुरूवात करते.

मुलगी : तुला काय येते?

मुलगा : मला घाम येतो !
तुला काय येते?

मुलगी : मला गाता येते !

मुलगा : मग गाऊन दाखव.

मुलगी : गाऊन तर बाहेर वाळत घातला आहे .

मुलगा : मग असूदे, वाळू दे!

ह्यावर ती मुलगी बाहेर जाते व मुठभर वाळू घेऊन येते.
.
पुढे काय,असे विचारताय?

मुलगा शॉक्स……… मुलगी रॉक्स !!!

एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.

थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले,” विकत घेतोस का ?”


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , दर्जेदार विनोद | Marathi Vinod हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment