मंगल समय घ्यावयाचे उखाणे 1000+ | Marathi Ukhane For Bride

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज Marathi Ukhane for Female Ukhane : Marathi ukhane for female,marathi ukhane for bride, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, ukhane in marathi comedy, marathi ukhane funny, marathi ukhane list, funny marathi ukhane या संधर्भात माहिती मिळेल.

मंगल समय घ्यावयाचे उखाणे

Marathi Ukhane For Bride

घरोघरी त्याच परी, तुमच्या घरी तेच माझ्या घरी

…. मात्र स्वभावाने लाख माणूस आहेत खरोखरी.




विज्ञानाने शोध लावला मानव गेला चंद्रावर

…. चे नाव सदैव कोरले माझ्या मनावर.




रुचकर भोजन झालं, जमलंय मस्त पान

…. चे नाव घ्यायला मला वाटतं छान.




काळोख्या पावसाळी रात्री वीज चमकून जाते

….. व…. चे आहे अद्वैताचे नाते.

हे पण वाचा 👇🏻

  • नवरीसाठी नवीन उखाणे
  • नवरदेवासाठी उखाणे



    पानांवरच्या दवबिंदू वर चमकतय कोवळ ऊन

    ….. चे नाव घेते मी…. ची सून.




    विवाह रुपी सागरात विहरते प्रीती रुपी नाव

    …. च्या प्रेमाशिवाय मला नाही कशाची हाव.




    बकुळीची नाजूक फुले, गंध काही मावेना

    ….. चे नाव घ्यायला उखाणा काही सुचेना.


विवाह रुपी कादंबरीत रेखल्या भावनेच्या ओळी

…. च्या नावाचं कुंकू लावते भाळी.




वाद्यात वाद्य सतार, उमटतात तिचे झंकार

…. चे नाव हाच माझा खरा अलंकार.




शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून

…. चे नाव घेते आपल्या सर्वांचा मान राखून.




समृद्धीची फुले मी आनंदाने वेचते

….. च्या सुखासाठी आपणाकडे शुभेच्छा मागते.




कृष्ण वेडी राधा त्याची अधीरपणे वाट पाहते

…. चे नाव…. घेते.




पर्वतराजीतून धावत येऊन सागराला मिळते सरिता

….. चे नाव घेते तुमच्या अग्रहा करिता




असं म्हणतात, प्रेम दिल्याने प्रेम वाढीस लागते

…. व…. चे आहे साताजन्मीचे नाते.


बरेच दिवसांनी सतारीची ऐकली सुरेल धून

….. च्या संसारात मी गेले रंगून.




संसाराच्या सारीपाटावर मांडला जीवनाचा खेळ

…. चे नाव घ्यायला आजची सुयोग्य वेळ.




ऋतू मागूनी ऋतू गेले, लोटला वर्षाचा काळ

….. च्या सहकार्याने ओवली संसाराची माळ.

मराठी उखाणे  Female

मराठी उखाणे  Female
मराठी उखाणे  Female

एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने

….. चे नाव मी घेईन आवडीने.




शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तिने

…. चे नाव घेते सक्तीपेक्षा भक्तीने.




असावे नेहमी हसतमुख, बोलावे नेहमी गोड

….. च्या संसाराला….. ची जोड.




नाव घे नाव घे आग्रह असतो सर्वांचा

…… चे नाव आहे ओठावर पण प्रश्न असतो उखाण्याचा.




आयोध्या च्या गादीवर राम-सीता बसले जोडीने

जाते बाई लवकर घरी मी….. च्या ओढीने.


Ukhane in Marathi



जाईजुईच्या फुलांचा गजरा घालते मी केसात

….. चे रूप असते सदैव माझ्या मनात.



….. माझा गाव, महालक्ष्मी माझं श्रद्धास्थान

….. व…..(मुलांची नावे) ची प्रगती हेच…. व…. चे आशास्थान.




वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकिळा गाते छान

….. चे नाव घेउन राखते सर्वांचा मान.




गुलाबाचा रंग दिसतो का कधी देठावर?

….. च नाव आहे माझ्या ओठावर.




संसारात असावी गोडी, नकोत वाद-विवाद

….. व….. ला द्यावा सर्वांनी आशीर्वाद.




लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी

…. चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.




मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरचा संगम

…. च्या संसारात झाला माझ्या सौख्याचा उगम.




सप्तपदी 7 पावलांनी केली संसाराची नांदी

….. च्या सहवासात….. आहे आनंदी.




नाव घे, नाव घे, करू नका गजर

….. चे नाव घ्यायला…. आहे हजर.

Ukhane in marathi for happy moment 

Ukhane in marathi for happy moment 
Ukhane in marathi for happy moment

                                                    चंद्र ग्रहण सुटले केले भरभरून दान

….. चे नाव घेऊन राखते तुमचा मान.


कुंजवणातून ऐकू येते श्रीकृष्णाची बासरी

….. च्या प्रेमासाठी आले मी सासरी.


नको गर्व संपत्तीचा, अभिमान नको विद्येचा

….. चा संसार करते मी सुखाचा.


मेघांचा होतो गडगडाट, वीज चमकून जाते

….. च्या नावाचे अखंड सौभाग्य मागते.


भिल्लीनीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा

….. च्या सौभाग्यासाठी केली महालक्ष्मीची पूजा.

Marathi Ukhane For Bride

भाजी केली, खारट झाली, मीठ झाले जास्त
….. च्या हुशारीवर माझी सारी भिस्त.


वैशाखाचे पडले ऊन, धरणी झाली तप्त

….. च्या संसारात मी आहे तृप्त.


उमलली कलिका, खुदकन हसली गालात

….. चा संसार चाललाय अगदी तालात.


अंगठीतल्या हिऱ्याला सोन्याचे कोंदण

….. चे नाव घेऊन गौरीला करते वंदन.


सोन्याच्या मंगळसूत्रात गुंफले काळे मणी

….. ची आठवण मनात असते क्षणोक्षणी.

Marathi Ukhane for Bride

Marathi Ukhane for Bride
Marathi Ukhane for Bride

सीतेने ओलांडली लक्ष्मणरेषा, म्हणून घडलं रामायण
….. चा संसार सुखाचा करीन केलाय मी पण.


देवीचे भरलं बोडणं, वाचला देवीचा पाठ

….. च्या बरोबर बांधली जन्मोजन्मीची गाठ.


दिसते तसे नसते म्हणून जग फसते

….. चे घर मात्र मला नंदनवणासारखे भासते.


सर्वांच्या आग्रहासाठी घेते उखाण्यातून नाव

….. ना म्हटलं”करियर”करायला द्या मला वाव.


ऑफिस मधून काम आवरून आले घाईघाई

….. चे नाव घेते….. ची आई.


सुंदर स्वच्छ अंगणात डोलत असावीत तुळस

….. च्या संसारावर चढवीन सोन्याचा कळस.


Marathi Ukhane list

 

सारंगीचे सुरेल संगीत कवी मनाला भावते
….. चे नाव घ्यायला मला खूपच आवडते.



भुंग्याच्या सहवासात विकसते कळी

….. चे नाव घेते….. च्या वेळी.




ताजमहल बांधण्यासाठी कारागीर आणले कुशल

….. चे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.




आई-वडिलांनी केले प्रेम, सासू-सासरे सर्व करतात मायने

….. चे नाव घेते मी आनंदाने.




दारच्या जाईची वेल गुजगोष्टी करते कानात

….. च्या नावाचा जप असतो माझ्या मनात.


smart marathi ukhane female



दागदागिन्यांनी नटले, नेसले सुंदर पैठणी

…… च्या संसारात रमले तरी माहेरच्या येतात आठवणी.




अंगणात लावली तुळस नेमाने घातले पाणी

….. चे नाव घेते….. लाडकी राणी.




जाई जुईचा वेल पसरला मांडवावर

….. च्या नावाचे तेज माझ्या कुंकूवावर.




बकुळीच्या झाडाखाली पडलाय सुवासिक सडा

….. व…… चा सुखी राहो जोडा.




प्रेमळ आणि हौशी आहेत सासू-सासरे आणि माता पिता

…… च्या रूपाने स्वर्ग आला हाता.




गणेशाची करते प्रार्थना, शिवपिंडीची करते पूजा

…… च्या साथीने चाखीन संसाराची मजा.


Marathi Ukhane Female



रसदार केशरी आंब्याचा केला गोड आमरस

….. च्या संसारात मनापासून झाले समरस.




जुन्या नाटकातील नाट्यपदे कानाला लागतात गोड

….. च्या संसाराला आहे….. ची जोड.




असं म्हणतात की मूर्खाचा कधी होऊ नये धनी

….. ची आठवण असते नेहमी माझ्या ध्यानीमनी.




सासर माहेरची नाती म्हणजे जणूकाही रेशीमगाठी

…… चे नाव आहे नेहमीच माझ्या ओठी.




पाना पानावर दव बिंदू पसरले, नाचत आली उषा

….. चे नाव घेते…. ची स्नुषा.



लक्ष्मीची करते पूजा, सरस्वतीची करते आराधना

….. राव सुखी राहोत हीच माझी प्रार्थना.




आशीर्वादरूपी फुले वेचते मी वाकून

….. च्या सह संसाराची मजा पाहते चाखून.




नाव घे, नाव घे, नावाचा चाललाय आग्रह

….. चे नाव घ्यायला करू नका सत्याग्रह.


सकाळी सकाळी पेपर वाचते सामना

….. च्याशिवाय मला अजिबात करमेना.



चहा गोड लागत नाही सामना वाचल्याशिवाय

चैन मला पडत नाही….. च्याशिवाय.




घरोघरी त्याच परी तुमच्या घरी तेच माझ्या घरी

….. च नाव घ्यायला मला बाई आवडतं भारी.




नाव घे, नाव घे, करू नका गलबला

….. बोलावत आहेत, लवकर जाऊ द्या मला.




आमराई मध्ये कोकिळा गोड गाते

….. च्या ओढीने बाई मी लवकर घरी जाते.

Ukhane in marathi for happy moment

 

                                            आयुष्याच्या सारीपाटावर खेळ मांडला संसाराचा

सर्वजण आग्रह करतायेत….. चे नाव घेण्याचा.



संसार रुपी कादंबरीत रेखल्या भावनेच्या ओळी

….. चे नाव घेते….. च्या वेळी.




संक्रांत झाली, होळी झाली, आजच गुढीपाडवा झाला

….. चे नाव घेते आशीर्वाद द्या मला.




जीवनरूपी सागरात विहरते पती-पत्नीची नौका

….. चे नाव घेते सर्वांनी ऐका.




जाते बाई मी पाणी भरायला नदीच्या काठावर

….. चे नाव आहे नेहमीच माझ्या ओठावर.




संसारात सुख समृद्धीने भरून जावे जीवन

….. च्या साथीने करीन घराचे नंदनवन.

Ukhane in Marathi



जीवनातील वळणावर लागतात कठीण घाट

….. च्या सहाय्याने शोधीन सुखाची वाट.




आंतरिक इच्छा होती बांधावी स्वतःची वास्तु

….. ना नुसतं म्हंटलं लगेच म्हणाले तथास्तु!




मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खूण

….. चे नाव घेते….. यांची सून.




बहारदार गायनाने मैफलीला चढते रंगत

….. ची लाभो मला जन्मोजन्मी साथ-संगत.




माहेरच्या आठवणीने डोळे माझे ओले

….. च्या संसारात खरोखरच धन्य झाले.




सुख समृद्धीने भरून गेला जीवनरूपी पेला

….. च्या साथीने संसार आनंद झाला.


latest marathi ukhane



रात्र सरली, रजनी गेली, धावत आली उषा

….. च्या सहवासात साकार झाल्या ध्येय आशा.



 राधिकेच्या राधिकेच्या पायातील घुंगरांचा मंजुळ नाद

….. च्या संसारात नकोत वितंडवाद.




पती-पत्नीचे कर्तव्य म्हणजे मुलांवर चांगले संस्कार

….. चा संसार सुखाने होवो साकार.




वसंताची चाहूल लागताच झाडांना फुटली पालवी

….. च्या संसारात होईन शांत सावली.




चेहरा असावा हसतमुख, गोड बोलावे नेहमी

….. च्या संसारासाठी आशीर्वाद द्यावा तुम्ही.




आशीर्वाद रुपी फुले अलगदपणे वेचते

….. च्या नावाचा उखाणा आवडीने घेते.




नमस्कार करते थोरांना, आशीर्वाद आम्हाला असावा

….. च्या संसारात दुःखाला थारा नसावा.


Marathi ukhane lagnatil naav ghene



कळत नाही माझेच मला आहे स्वप्न की आभास

….. च्या संसारात दरवळू दे सौख्याचा सुवास.




प्रीत वेडी राधिका शोभे कृष्णासवे

….. च्या प्रीतीचे सुख वाटते रोज नवे.




शेषशायी भगवान सर्व जगाचा वाली

….. च्या प्रेमात नहाते, मी आहे भाग्यशाली.




पावसाच्या धारा कोसळल्या गाते मेघमल्हार

संसाराच्या कसरतीत मला वाटतो….. चा आधार.




तिन्हीसांजेच्या वेळी देवाजवळ लावते सांजवात

….. च्या साथीने संसार होवो आनंदात.




आसमंत रुपी अंगणात मनरूपी वृंदावन

….. च्या साथीने झाले आयुष्याचे नंदनवन.




Marathi ukhane lagnatil naav ghene

 अमराइ मध्ये कुहुकुहु करतो कोकीळ पक्षी

….. चे नाव घेते…. या दिवशी.




…. चा वंश देत आहे हुंकार

…. ची प्रगती हाच माझा अलंकार.




…. च्या वंशवेलीवर उमलू पाही कळी

…. चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी.




पौर्णिमेचं चांदणं हसते माझ्या गाली

….. च्या वारसाची चाहूल मला लागली.

 

 

बाळाच्या नाजूक गालावर पडते इवलीशी खळी

…. च्या संसारवेलीवर उमलेल नाजूक कळी.




चिंचा ,आवळे, बोरे कैरी तोंडाला सुटले पाणी

…. च्या वंशामध्ये पाहुणा येणार कुणी.




दारची जाई सांगते जुईला….. आली आहे माहेरपणाला

….. चे नाव घेऊन वंदन करते मंगळागौरीला.




पत्री फुले रचून मंगळागौरीची केली आरास

….. चा संसार आदर्श व्हावा हाच माझा ध्यास.




मंगळागौरीचे दिवशी खेळाला आले उधान

….. च्या सहवासात सुखाला नाही वाण.

Marathi ukhane for female

विवाहाच्या मंगल वेळी मांडला संसाराचा सारीपाट

….. च्या जीवावर उडविला मुंजीचा थाट.




मातेच्या ममतेचे करू नये मोल

….. चे माझ्यावरचे प्रेम राहो खोल.




चांदीच्या लामण दिव्यात लावल्या सोन्याच्या वाती

मला सुखी ठेवायचे आहे आता….. च्या हाती.




मंद मंद चाले होडी, झुळझुळ वाहे वारा

…. चा संसार भरलाय सुख समृद्धीने सारा.




नक्षत्र फुलतात आकाशी, कमलीनी फुलतात तळी

…. च्या नावाचे कुंकू लावते भाळी.




सुखदुःखाचे गणित मांडले उत्तर आले समाधान

….. चे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.




संसार रुपी सारीपटावर सुख-दुःखाची प्यादी

…. च्या संसारात बसलें समाधानाची गादी.




येवल्याहुन आणली पैठणी, तिला मोराचा पदर

….. च्याबद्दल मला वाटतो आदर.

Marathi ukhane for female

चांदीच्या वाटीत ठेवला गोड खवा

….. चे नाव घेते लक्षात ठेवा.




आशीर्वादाची फुले वेचते मी आदराने

…. ची पत्नी म्हणून मिरवते मी मानाने.




संसाराच्या सारीपाटावर पडले सुख-दुःखाचे दान

…. चे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.




दारातला सोनचाफा पानोपानी बहरला

….. च्या प्रितीने जीव माझा मोहरला.




पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलाय दारी

….. च्या सहकार्याने सुख पसरेन संसारी.




संसार रुपी पेल्या मध्ये ओतलं समाधानाचं पेय

….. चा संसार सुखी व्हावा हेच माझं ध्येय.




इंग्रजी भाषेमध्ये सूर्याला म्हणतात सन

….. चे नाव घेताना भरून येते माझे मन.




मऊमऊ लोकरीची केली शाल विणून

….. चे नाव घेते आपण आग्रह करता म्हणून.




पक्षात पक्ष शिवसेना, पेपरात पेपर सामना

…. आहेत माझा अनमोल दागिना.

 

Marathi ukhane for female

 

मंगळागौरीच्या पूजेला वाहते मी साळी डाळी
…… च्या संसारात लिहिते भाग्याच्या ओळी.



कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज

……. चं नाव घेते मंगळागौर आहे आज.


सूर्य गेला अस्ताला आकाशात उगवला शशी

….. चे नाव घेते….. च्या दिवशी.


दारी घातला लग्न मंडप, लावले फुलांचे तोरण

….. चे नाव घेते…. सणाचे कारण.


सातारचे प्रसिद्ध आहेत कंदी पेढे
….. चे नाव घेते….. साठी जमलेल्यांच्यापुढे.


मंगळागौरीचे करते व्रत, करते मनोभावे नमस्कार

….. च्या संसारात होवोत सर्व इच्छा साकार.

Marathi ukhane for female


भरजरी पैठणी नेसले, घातला चपलाहार आणि ठुशी

….. चे नाव घेते….. च्या दिवशी.


संसार रुपी सागरात बरसात व्हावी सौभाग्याची
…… चे नाव घेते आई मी…. ची.


प्रत्येक मातेला प्रश्न पडतो कशी होऊ मी बाळाची उतराई?

….. चे नाव घेते मी….. ची आई किंवा…..  ची आत्याबाई.


देवघरामध्ये लावल्या सुवासिक उदबत्या

….. चे नाव घेते….. ची आत्या.

बारशाचा उडविला थाट, बहीण मेव्हणे आहेत हौशी
….. चे नाव घेते मी….. ची मावशी.


शांत निरभ्र आकाशात बरसात झाली चांदण्यांची

….. चे नाव घेते मावशी मी बाळाची.


उन्हाळ्याचा कडाका वाढला, खाली आईस्क्रीम गारस

….. चे नाव घेते आज आहे….. च बारस.


Marathi ukhane for female


नेसली जरीकाठी साडी, दंडात घातले बाजूबंद

….. व…. च्या जीवनात बाळाने भरलाय आनंद.




पंचधातूचे वाळे आणि गळ्यात जीवतीच पान

….. च नाव घेऊन राखते सर्वांचा मान.




चांदीचे वाळे घातले….. च्या पायात

….. चे नाव घेते नातेवाईकांच्या मेळाव्यात.



 

शिसवी पाळण्याला केला मोत्यांचा साज

…. चे नाव घेते…. चे बारसे आज.




संसार रुपी काव्यांमध्ये लिहिल्या भाग्याच्या ओळी.

….. चे नाव घेते….. च्या वेळी.



सासू सासरे आहेत हौशी, म्हणून….. चा केला थाट मोठा

….. च्या संसारात नाही सुखाला तोटा.



मनासारखा पती मिळावा म्हणून देवाला केला नवस

….. चे नाव घेते आहे….. च्या बारशाचा दिवस.




बगळ्यांची माळ उंच विहरते आकाशी

….. च नाव घेते…. च्या बारशाच्या दिवशी.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , मंगल समय घ्यावयाचे उखाणे 1000+ | Marathi Ukhane For Bride हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻 


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment