जीवनावर मराठी सुविचार Marathi Suvichar Quotes for Success Life Quotes

MarathiStyle.com daily update life motivational quotes in marathi for success suvichar whatsapp status with images, Motivational Sms In Marathi For Success, Quotes Good Thoughts In Marathi, marathi suvichar quotes

Marathi Suvichar Quotes for life जीवनावर/आयुष्यावर सुविचार (life Quotes)

 अनोळख्याला भाकरी द्यावी, पण ओसरी देऊ नये.

 आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

 आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .

 आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे.

 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते … तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?

 आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

 आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

 आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

 आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

 आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

प्रेरणादायक सुविचार | Marathi success suvichar whatsapp status

प्रेरणादायक सुविचार | Marathi success suvichar status
प्रेरणादायक सुविचार | Marathi success suvichar status

 आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . . हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!

 आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

हे पण वाचा 👇🏻

मैत्री स्टेटस मराठी

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

 आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

 आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

 एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

 एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

 कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं. दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं.. दुःख असुनही दाखवायचं नसतं.. अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:

 कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.

 खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात… पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…

 छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

 जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

Motivational sms in marathi for success

 जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

 जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.

 ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच, तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत…

 तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

 तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

 तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते

 तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

 नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

 परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

 पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात .

 पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.

 भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

 माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

 माणसाला “बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते

 लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

 विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.

whatsapp suvichar marathi sms

 शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

 संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.

 समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

 सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये , आजारी पडू इतके खाऊ नये , कर्ज होईल इतके खर्चू नये , आणि भांडण होईल इतके बोलू नये .

 सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

 “जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”

 वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…

 आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात

 जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो…..!

 गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…

 नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका . नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. कारण भविष्य तर त्यांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात़

 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही

 फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे

 जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

 इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी | Inspirational Thoughts In Marathi Language

मराठी सुविचारसंग्रह मराठी सुविचार
मराठी सुविचारसंग्रह मराठी सुविचार

 ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.

 “आयुष्य खूप साधं असत. कधीकधी खूप रटाळ असत. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.”

 मरण अखेर येतंच हे स्वतःपुरत खरं कसं मानायचं आता आपण नाही हे मेलेल्याने सांगा कसं जाणायचं ?

 शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजत आणि शब्दांच जीवनाशी काय नात असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा होंल सोडला कि परिक्षेच ओझ झटकता येत, कारण पदवीपुरता त्या होंलशी संबंध असतो. पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हांच त्यांचा खरा अर्थ समजतो.

 ‘तडजोड’ म्हणजे सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’

 ‘ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं मानलं जातं. सगळ्याच ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. आणि ज्योतीचा जय होणार नाही कशावरून ? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.

 पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच …..

 “कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात ..स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो ..”

Marathi Suvichar Quotes/मराठी सुविचार

 “तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे ; पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला कधीही क्षमा करू नका आणि तुमचं भरून न येणारं ,आयुष्यातून उठवणार एखाद कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करा”

 “आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका … कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही”

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

 “सत्य” ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण “असत्य” हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…!

 नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर.. आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर..

 समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे

 थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात

 

 जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे…

Quotes Good Thoughts In Marathi

 आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर दुरावा वाढतो, अंतर वाढते.. यात चूक त्याची पण नसते, आणि तिची पण नसते, चूक वेळेची असते….. यावर एकाच उपाय आहे, त्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील जीवाला जीव देणारी माणसं खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका… आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते…

 आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं..! रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छानअसतं…! शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्मअसतं…! मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं…! होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,कुठलंच पान कधी गाळायच नसतं….! चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढेशिकायचं असतं…..!

 रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात….

मराठी सुविचारसंग्रह मराठी सुविचार | Marathi suvichar Quotes

 ठेच तर पायाला लागते वेदना माञ मनाला होतात. आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं. असच नात जपत जगण, हेच तर खरं जीवन असतं.

 आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा । प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा । क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका । संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा । आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

 कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता…

 ” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”

 आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन . आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन .

 पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात .

 आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .

 आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल

Motivational Sms In Marathi For Success

आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…. कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं

 ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत

 तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे

समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे

 आयुष्यातील कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनु नका

 आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका

 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!!

आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते

 जो दुसर्यांना आधार देतो त्याला कोणचं आधार देत नाही

 मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही, कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!

 “जीवनातिल कडवे सत्य” अनाथ आश्रमात मूले असतात, “गरीबांचे”… आणि… वृद्धाश्रमात म्हातारे असतात ” “श्रीमंतांचे”….!!!

 आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत

 जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो, “कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , जीवनावर/आयुषावर मराठी सुविचार Life Quotes in Marathi Suvichar for Success हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

 

Leave a Comment