दारू जोक्स मराठी | Daru Jokes In Marathi Sms chutkule

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज daru jokes in marathi, Darude jokes in marathi, दारू जोक्स मराठी, funny drunk jokes या संधर्भात माहिती मिळेल.

दारू जोक्स मराठी | Daru Jokes In Marathi Sms chutkule

एक दारुड्या ICU त पडलेला असतो.

डॉक्टर येऊन त्याला तपासतात.

डॉक्टर : तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना?

दारुड्या : हो. खूपच दुखतंय ओ डॉक्टर.

डॉक्टर : बरं, बरं, तुम्ही देशी घेता का?

दारुड्या : (जरा विचार करून) हो हो. पण एकच पेग द्या हं…जास्त नको.

एकदा एका बेवड्याला एक हवालदार समजावत असतो की दारू पिण्याने संसार कसा उध्वस्त होतो ते.

पण बेवडा मात्र याच्या उलट दारू पिण्याने संसार कसा टिकतो ते हवालदाराला सांगत होता.

हवालदार : मला सांग, तुला बायको महत्वाची वाटते की दारू?
बेवडा : (एक क्षणही विचार न करता) दारू.

हवालदार : का?

बेवडा : कारण, जेव्हा बायको मला मारते, तेव्हा दारू पिलेला असल्यानेच मला लागत नाही. म्हणजे साहजिकच मी तिच्यावर हात उगारत नाही, रागवत नाही आणि आमचा संसार टिकून राहतो. आलं लक्षात?

drunker jokes in marathi

एक दारुड्या गटारी अमावास्येला फुल्ल टाईट होऊन रस्त्याच्या कडेकडेने हलत-डुलत चालला होता.
दारूच्या नशेत तो काहीही बरळायचा.

तो असाच म्हणतो, “च्यायला मला दारूला कुणी बंदी घातली या महाराष्ट्रात, तर मी महाराष्ट्र त्या अरबी का फिरबी समुद्रात बुडवीन.”

त्याचं हे असलं वागणं पाहून तिथून जाणार्‍या एका हवालदाराने त्याला हटकलं.

हवालदार : ए, आधी स्वत:ला सांभाळ. कुणी ऐकलं तर मरेस्तोवर मार खाशील.
दारुड्या : का म्हणून? मला दारू प्यायला बंदी घातली तर अख्खा महाराष्ट्र गणपतीसारखा तीनवेळा पाण्यात बुडवून विसर्जन करीन.

हवालदार : काय येडा समजलास मला. दारू पिऊन काहीही बरळू नकोस. फटाके फोडू का?
दारुड्या : मी दारू प्यायलोय? बरं, मग उद्या सकाळी फेकतो त्याला, या दारूची शप्पथ.

हवालदार : तसं मला लिहून दे. उद्या उतरल्यावर नाही म्हणशील.

दारुड्या तसं लिहून देतो की, हवालदार श्री. चंद्रकांत पावट्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मी अख्खा महाराष्ट्र अरबी समुद्रात फेकीन. तसे नाही केल्यास मी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्यासाठी जी काही शिक्षा असेल ती भोगण्यास पात्र राहीन.

दुसर्‍या दिवशी हवालदार त्याला इन्स्पेक्टरच्या पुढे उभा करतो आणि रात्री झालेली हकीकत सांगतो.

इन्स्पेक्टर : काय रे? जीभ जास्त वळवळते काय तुझी? चल आता फेक बघू महाराष्ट्र त्या अरबी समुद्रात.

दारुड्या : ठीक आहे साहेब, आत्ता फेकतो. फक्त तो उचलून माझ्या खांद्यावर ठेवा तुम्ही.😂

फनी जोक्स मराठी

इजिप्शियन दारुडा खाली पृथ्वीवर बोट दाखवून म्हणतो, “ती बघा, ती मोठ्ठी लाईन दिसते ना, ती आमच्या देशातली आणि जगातली सर्वात लांब नदी आहे.”

चीनचा दारुडा : नाही रे, ती तर आमच्या देशातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब भिंत आहे.

मराठी दारुडा : चल ए. ती तर महाराष्ट्रातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब वाईन शॉपच्या बाहेरची दारूड्यांची लाईन आहे.

हे पण वाचा 👇🏻

नवीन मराठी चावट जोक्स

एकदा एक बेवडा “कोण होईल मराठी करोडपती” मालिकेत भाग घेतो.

त्याला सचिन खेडेकर एक प्रश्न विचारतात, “एक हजारासाठी हा प्रश्न.”

“भारतात सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो? आणि पर्याय आहेत…”

बेवडा : थांबा, थांबा. पर्याय कसले देताय. उत्तर अगदी सोप्पं आहे. सकाळी ८ वाजण्यापूर्वी काश्मीरमध्ये आणि संध्याकाळी ८ नंतर विस्कीच्या बाटलीमध्ये.

एक बेवडा गटारीच्या निमित्ताने ढोसून घरी येतो.
बायको दार उघडते.

बेवडा : नमस्कार, कोण आपण? इथे काय करताय?

बायको : तुम्ही मला विसरलात? हिंमत कशी काय झाली तुमची मला विसरायची?
बेवडा : ए, तुला माहीत नाही काय. दारूच्या नशेत माणूस सगळी दु:ख विसरून जातो.

vinod pinyache

एक दारुड्या रंगाच्या दुकानात जातो.

दारुड्या : मला घराला लावण्यासाठी रंग पाहिजे. कोणता रंग चांगला आहे?

दुकानदार : हा घ्या, १००० रूपयांचा रॉयल पेंट. एकदा लावून तर बघा घर कसं रंगीबेरंगी दिसेल ते.

दारुड्या : अरे हट…एवढा महाग? त्यापेक्षा मी एक १०० रुपयांची “रॉयल स्टॅग” घेतो. मग नुसतं घरंच काय सगळं शहर रंगीबेरंगी दिसेल.

एक बेवडा फुल्ल तर्राट होऊन रोज सकाळी शंकराच्या देवळात पाया पडून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जात असतो.

एक दिवस देवळातला पुजारी शंकराच्या मूर्तीच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवतो.

बेवडा नेहमीप्रमाणे सकाळी शंकराच्या दर्शनाला येतो.

शंकराच्या जागी गणपतीला पाहून म्हणतो, “ए छोट्या, तुझ्या पप्पाच्या आशीर्वादानं आपलं कसं मस्त चाललंय. पप्पाला म्हणावं काका येऊन गेले आज. आठवणीनं सांग बरं.”🤣

एक बेवडा गटारीच्या निमित्ताने ढोसून घरी येतो.
बायको दार उघडते.

बेवडा : नमस्कार, कोण आपण? इथे काय करताय?

बायको : तुम्ही मला विसरलात? हिंमत कशी काय झाली तुमची मला विसरायची?
बेवडा : ए, तुला माहीत नाही काय. दारूच्या नशेत माणूस सगळी दु:ख विसरून जातो.

marathi chutkule sms

दारुड्या : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का?

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. आजपर्यंत मी अनेकांची सोडवली आहे.

दारुड्या : अहो, पोलिसांनी माझ्या ४ बाटल्या पकडल्यात. कृपया सोडवून आणा ना.

दोन बेवडे एका हातभट्टीवर जातात. १-१ पेग टाकतात.

पहिला दारुड्या : चल आज आपण एवढी दारू प्यायची की समोर जी ४ झाडं आहे ना ती ८ दिसली पाहिजेत.

दूसरा दारुड्या : अरे पण समोर तर २ च झाडं आहेत.

दोन बेवडे फुल्ल टाईट होऊन चाललेले असतात.

एक बेवडा : अरे काय सांगू यार. आज माझं घड्याळंच हरवलं.

दूसरा बेवडा : ते चालत होतं का?

पहिला बेवडा : हो.

दूसरा बेवडा : मग ते चालतच कुठेतरी निघून गेलं असणार.

नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा रिकामा दिसेल,

तर

नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा भरलेला दिसेल.

परंतु,

व्यावहारिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती त्यात ६० मिलिलिटर व्हिस्की टाकून म्हणेल, “चीयर्स !”

एक दारुडा हातभट्टीतून फुगा घेऊन घरी येतो.

जेवताना तो हळूच फुगा काढून बायकोची नजर चुकवत ग्लासमध्ये थोडी दारू ओततो.

पण, त्याची चाणाक्ष बायको मात्र त्याला पकडते.

बायको : काय हो, तुम्हाला हजारदा सांगूनही अजिबात डोक्यात बसत नाही का दारू प्यायची नाही म्हणून? नुसती ऐश करत जगायची सवय लागलीय. जरा बायको-पोरांचा तरी विचार करा की.

दारुड्या नवरा तो दारूचा ग्लास त्याच्या बायकोच्या तोंडाला लावतो आणि तिला थोडीशी दारू पाजतो.

बायको : छी ! थू ! कित्ती घाण वास येतोय?

दारुड्या नवरा : पाहिलंस? आणि तू म्हणतेस की मी ऐश करतोय म्हणून.😅

दोन दारूड्यांमधलं हे संभाषन :

पहिला : अरे तू काल संध्याकाळी सातच्या बातम्या ऐकल्या का?

दूसरा : नाही. काय विशेष?

पहिला : काल संशोधकांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ सापडल्याचं जाहीर केलं

दूसरा : वा, वा, वा !!! म्हणजे आता आपल्याला फक्त व्हिस्कीच घेऊन जावं लागणार.

Bewada jokes

एक बेवडा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन येतो.

बायको : काय हो, तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतंत ना मला सकाळी?

वेबडा : हो, बरोबर आहे. पण मी तरी काय करणार? रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना

एक बेवडा फुल्ल टाईट होऊन रात्रीच्या वेळी रस्त्याने आरडा-ओरड करत हे पोस्टर वाच, ते पोस्टर वाच, रस्त्यावर दिसेल त्याला उपदेशाचे डोस पाज असं करत त्याच्यातच रमत गमत चालला होता.

तेवढ्यात त्याला एक पोस्टर दिसतं.

त्यावर लिहिलेलं असतं, “If you drink every day, You will become Alcoholic.”

बेवडा खुश होतो आणि म्हणतो, “वाचलो बाबा, मी तर फक्त रात्रीचीच पितो.”

drink jokes

एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि साधूजवळ जाऊन बसला.

तो साधू दु:खी स्वरात त्याला म्हणाला, “बाळ, तुला ठाऊक नाही की, तू सरळ नरकात जात आहेस.”

हे ऐकून तो दारुड्या उठला आणि जोराने ओरडला, “ड्रायव्हर, बस थांबव. मी चुकीच्या बसमध्ये चढलोय.”

एकदा एक दारुड्या चालता चालता एका साधूला धडकला.
साधू : (रागाने) ए मूर्ख,मै तुझे श्राप देता हूं ।
दारुड्या : रुकिये महाराज,मै ग्लास लेके आता हूं ।

एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.

एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले, “चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?”

दारुड्या : धन्यवाद हवालदार साहेब, तुम्ही मला सांगितल्याबद्दल.

मला वाटले, मी लंगडा झालोय.

दोन दारुडे फुल्ल पिऊन रस्त्याने चाललेले असतात.

त्यांना रस्त्यात एक आरसा सापडतो.

पहिला दारुड्या तो आरसा घेतो आणि त्यात पाहतो. आरशात पाहून म्हणतो, “अरे ए, हा बघ बरं कुणाचा फोटो आहे.”

दूसरा दारुड्या : बघू बरं.

तो आरशात पाहतो आणि म्हणतो, गधड्या एवढं पण समजत नाही का? हा तर माझाच फोटो आहे.

रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत चाललेले असतात.

रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बर्‍यापैकी मोठं डबक दिसतं.

पहिला दारुड्या : अरे, हे बघ इथं काय आहे.

दूसरा दारुड्या : अरे काय तरीच काय. हा तर चंद्र आहे.

पहिला दारुड्या : अरे बापरे, चल घरी चल लवकर. आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो.

एक दारुड्या वर्तमानपत्र वाचत बसलेला असतो.

वर्तमानपत्रात एका पाहणीचा निष्कर्ष सांगितलेला असतो.

पाहणीचा निष्कर्ष : महाराष्ट्रात दरवर्षी जेवढे अपघात होतात, त्यापैकी सुमारे २० % अपघात हे दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात.

दारुड्याचा निष्कर्ष : याचाच अर्थ असा होतो की सुमारे ८० % अपघात हे दारू न पिता वाहन चालविल्याने होतात. म्हणून दारू न पिता वाहन चालविणे धोक्याचे आहे.🤣

bewada navara

एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.

एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले, “एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?”

दारुड्या : काय करणार साहेब, बाटलीचं झाकणंच हरवलं त्यामुळे दूसरा मार्गच नव्हता बघा.

एक दारुड्या फुल्ल टाईट होऊन घरी जातो.
बायकोशी त्याचं चांगलंच वाजतं.

हा राहत असतो पहिल्या मजल्यावर.
बायको एक लाथ घालते ह्याच्या केपटात, तसा हा गच्चीवरून खाली पडतो.

जोरात धाड ssss असा आवाज आल्याने सगळे इमारतीतले लोक खाली पळत येतात आणि त्याला विचारतात, “काय झाले हो?”

बेवडा : मला पण नाही कळलं काय झालं ते. मी पण जस्ट आत्ताच तुमच्याआधी खाली आलो.

दारुड्यांनी न्युज चॅनेल सुरु केला तर त्याच नाव काय असेल?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“पी चोवीस तास”
🍻🍻🍻🍻😎😎
रहा एक पॅक पुढे.
😜 ऊघडा झाकण,
प्या पटकण


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, दारू जोक्स मराठी | Daru Jokes In Marathi Sms chutkule हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

  •  

Leave a Comment